राजस्थान: नोकरीच्या नावाखाली सामूहिक बलात्कार केल्याचा काँग्रेस नेत्यावर आरोप!

सिरोही नगरपरिषदेचे अध्यक्ष आणि माजी आयुक्त यांच्यावर गुन्हा दाखल

राजस्थान: नोकरीच्या नावाखाली सामूहिक बलात्कार केल्याचा काँग्रेस नेत्यावर आरोप!

राजस्थानमधील काँग्रेस पक्षाचे सिरोही नगरपरिषदेचे अध्यक्ष महेंद्र मेवाडा आणि नगरपरिषदेचे माजी आयुक्त महेंद्र चौधरी यांच्यावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अंगणवाडीत नोकरी देण्याच्या नावाखाली सुमारे २० महिलांवर सामूहिक बलात्कार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

पाली जिल्ह्यातील एका महिलेने पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर ही घटना उघडकीस आली.पीडित महिलेने पोलिसांना सांगितले की, अंगणवाडीत नोकरी लावतो असे सांगून आरोपीने माझासह सुमारे २० महिलांची फसवणूककरून बलात्कार केला.महिलेने असाही दावा केला की, आरोपीने लैंगिक अत्याचाराचे चित्रीकरण केले आहे.हे फुटेज सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी दिली.तसेच पीडितांना ब्लॅकमेल करत प्रत्येकी पाच लाख रुपयांची मागणी केली.

तक्रारीनुसार, ही महिला इतर महिलांसोबत अंगणवाडीत काम करण्यासाठी काही महिन्यांपूर्वी सिरोहीला गेली होती.तेव्हा त्या ठिकाणी आरोपीशी ओळख झाली आणि आरोपीने त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली.

हे ही वाचा:

उत्तराखंड: हल्दवानी हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार अब्दुल मलिक पोलिसांच्या ताब्यात!

सिक्कीम येथील जत्रेत घुसला ट्रक, तीन ठार

निवडणूक निकालानंतर पाकिस्तानमध्ये निदर्शने; निकालविलंबाने गोंधळ वाढला

 मेडिकलच्या विद्यार्थांना रील्स केल्याबद्दल दंड

पीडित महिलेने आरोप केला की, आम्हाला देण्यात आलेल्या जेवणामध्ये काहीतरी घातले होते, जे आम्ही सेवन केल्यानंतर आम्हाला झोप आली आणि आमच्यावर लैंगिक अत्याचार झाला.शुद्धीवर आल्यानंतर आम्ही आरोपींशी सामना केला, तेव्हा त्यांनी स्वतःच्या हेतूसाठी फसवल्याचे कबूल केले.त्यानंतर आरोपींनी महिलांना त्यांच्या मागणीनुसार शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले, असा दावा महिलेने केला आहे.

या प्रकरणी पोलिस उपअधीक्षक पारस चौधरी यांनी सांगितले की, महिलांनी यापूर्वी खोटी तक्रार दाखल केली होती. मात्र, आठ महिलांच्या याचिकेवर राजस्थान उच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.त्यानुसार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version