लावण्याला न्याय द्यायला सरसावला बालहक्क आयोग

लावण्याला न्याय द्यायला सरसावला बालहक्क आयोग

काही दिवसांपूर्वी प्रकाश झोतात आलेल्या तामिळनाडूमधील लावण्या या लहान मुलीच्या आत्महत्येच्या घटनेने साऱ्या देशाला हादरवून सोडले होते. पण या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला असून या प्रकरणात आता राष्ट्रीय बाल हक्क आयोगाची एन्ट्री झाली आहे. राष्ट्रीय बाल हक्क आयोगाची समिती या संपूर्ण प्रकरणात चौकशी करणार असून या चौकशीसाठी ही समिती तामिळनाडूला भेट देणार आहे. जानेवारीच्या अखेरच्या दोन दिवसात म्हणजेच ३० आणि ३१ जानेवारी रोजी राष्ट्रीय बाल हक्क आयोगाचे पथक तामिळनाडूमध्ये जाऊन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार आहे. या समितीच्या अध्यक्षस्थानी खुद्द आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानुंगो हे असणार आहेत. त्यांच्याच नेतृत्वात बाल हक्क आयोगाचे पथक या प्रकरणात सखोल चौकशी करताना दिसेल.

तमिळनाडूमधील तंजावर जिल्ह्यातील लावण्या नावाच्या का लहान मुलीने आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. तिच्या सेक्रेड हार्ट हायस्कूल या शाळेत लावण्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकला जात असल्याचे म्हटले जात आहे. लावण्याने बेकायदेशीररित्या धर्मांतर करावे यासाठी तिच्यावर सतत शाळेतून दबाव टाकला जात होता आणि तसे करायला नकार दिल्यावर तिला गंभीर स्वरूपाच्या शिक्षा दिल्या जात असत. याच सर्व त्रासाला कंटाळून लावण्या या लहान मुलीने आत्महत्या केली. किटकनाशके पिऊन तिने स्वतःचा जीव संपवला.

हे ही वाचा:

आश्चर्य!!! सहा महिने बेशुद्ध राहून कोरोनावर केली मात

… म्हणून क्रिकेटपटू पीटरसनने मोदींना लिहिले हिंदीतून पत्र

शिवसेना विभाग प्रमुखाला भररस्त्यात महिलेने दिला चोप

‘अनिल देशमुख पोलिसांच्या बदली, पोस्टिंगची यादी द्यायचे’

या संपूर्ण प्रकरणात राष्ट्रीय बाल हक्क आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली असून या तक्रारीत वरील सर्व आरोप करण्यात आले आहेत. या तक्रारीच्या आधारावरूनच राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने यासंबंधी चौकशी समिती नेमायचे ठरवले असून आयोगाच्या अध्यक्ष्यांच्या नेतृत्वात ही समिती आपले कामकाज करेल.

दरम्यान या संपूर्ण चौकशी समितीला अपेक्षित त्या सुविधा आणि सहाय्य देण्यास तमिळनाडू सरकार चालढकल करताना दिसत आहे. त्यासाठी तमिळनाडूतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे राज्यात लागलेल्या आचारसंहितेचे कारण पुढे केले जात आहे. पण तरीदेखील बाल हक्क आयोग ३० आणि ३१ जानेवारी रोजी तमिळनाडू मध्ये जाऊन चौकशी करण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम आहे. यावेळी या संपूर्ण प्रकरणातील तपास अधिकारी, लावण्याचे आई वडील, शाळेतील इतर विद्यार्थी, तसेच तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर, पोस्टमार्टम करण्याचे डॉक्टर या सर्वांशी आयोगाचे सदस्य संवाद साधणार आहेत.

Exit mobile version