राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या

दोन संशयितांना घेतले ताब्यात

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची शनिवारी बांद्रा येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी यांच्यावर चार गोळ्या मारण्यात आल्या. त्यातील एक गोळी त्यांच्या छातीत लागली असून त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.गोळीबारात जखमी झालेल्या बाबा सिद्दीकी याना तात्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण तिथे दाखल करण्यापूर्वी त्यांना मृत घोषित करण्यात आले.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लीलावती येथे भेट दिली आणि परिस्थिती जाणून घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द करत मुंबईला धाव घेतली.

या हत्येमागे नेमका कुणाचा हात आहे याचा शोध घेतला जात आहे. पण एखादा गँगस्टर यामागे असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लॉरेन्स बिष्णोई गँगचा यात हात असावा असेही सांगितले जात आहे.

हे ही वाचा:

‘हिऱ्यापोटी जन्मलेल्या गारगोट्यांना हिंदू म्हणवून घेण्याची लाज वाटते’

बांगलादेशातील मंदिरे, मंडपांवर हल्ल्याचा भारताकडून निषेध!

काँग्रेस आमदार सुलभा खोडके यांची पक्षातून हकालपट्टी

सरसंघचालकांनी हिंदू समाजाला वेळीच केलं सावध

बाबा सिद्दीकी यांचे अभिनेता सलमान खान याच्याशी जवळचे संबंध होते. सलमानच्या घरावर मध्यंतरी बिष्णोई गँगच्या गुंडांनी हल्ला केला होता. त्यामुळे सिद्दीकी यांच्यावर हल्ला करणारे त्याच गँगचे सदस्य आहेत का याचा शोध घेतला जात आहे.
ताब्यात घेतलेल्या दोघांपैकी एक हरियाणाचा तर एक उत्तर प्रदेशचा असल्याचे कळते.

Exit mobile version