ठाण्यात एनसीसीच्या कॅडेट्सना अमानुष मारहाणीचा व्हीडिओ व्हायरल

जोशी बेडेकर कॉलेजकडून स्पष्टीकरण

ठाण्यात एनसीसीच्या कॅडेट्सना अमानुष मारहाणीचा व्हीडिओ व्हायरल

एनसीसीच्या कॅडेट्सना काठीने एक जण अमानुष मारहाण करत असल्याचा व्हीडिओ गुरुवारी व्हायरल झाला. ठाण्यातील एका कॉलेजात हे ट्रेनिंग सुरू असल्याचा हा व्हीडिओ होता. त्यात एक जण ओणवे झालेल्या एनसीसी कॅडेट्सना काठीने जोराने मारहाण करत आहे.

 

 

हे सगळे कॅडेट्स चिखलात ओणवे आहेत. त्यांना हात मागून वर करत डोके जमिनीवर चिखलात ठेवण्याची शिक्षा देण्यात आली आहे. त्यानंतर सदर व्यक्ती काठीने त्यांच्या पार्श्वभागावर वारंवार मारहाण करताना दिसत आहे. विद्या प्रसार मंडळाच्या कॅम्पसमधील हा व्हीडिओ असल्याचे समोर आले आहे. तिथे जोशी बेडेकर कॉलेज आणि बांदोडकर कॉलेज आहेत. कॉलेजमधील एका खिडकीतून हा व्हीडिओ काढण्यात आला आहे. तो व्हीडिओ काढताना या मुलांना होत असलेल्या मारहाणीबद्दल चिंता व्यक्त केली जात होती.

 

हे ही वाचा:

केजरीवाल यांच्या बंगल्याचे सत्य लपविण्यासाठीच सेवा विधेयकाला विरोध

अमित शहा लोकसभेत पंडित नेहरूंबद्दल बोलले…विरोधक झाले निरुत्तर!

पुणे दहशतवादी प्रकरणातील पाचवा आरोपी देत होता बॉम्बस्फोट घडवण्याचे प्रशिक्षण

माझा टोमणे मारायचा स्वभाव नाही…अजित पवारांचा टोला

यासंदर्भात जोशी बेडेकर कॉलेजच्या प्रिन्सिपॉल सुचित्रा नाईक म्हणाल्या की, या घटनेमुळे विद्यार्थ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत. या घटनेमुळे एनसीसी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मात्र भीतीचे वातावरण आहे. त्यातल्या अनेक विद्यार्थ्यांनी एनसीसीत परतण्यास नकार दिलेला आहे.

 

 

त्याबदद्ल नाईक म्हणतात की, विद्यार्थ्यांनी एनसीसी सोडून जाता कामा नये. अशा घटना घडू नयेत यासाठी एक समिती स्थापन केली जाईल. दरम्यान, ही घटना घडली तेव्हा तेथे कुणीही कर्मचारी नव्हता. जो विद्यार्थी या कॅडेट्सना मारत आहे तो सीनियर विद्यार्थी असण्याची शक्यता आहे.

 

Exit mobile version