एनसीबीची मोठी कारवाई, १५ हजार एलएसडी ड्रग पाऊच जप्त

'एनसीबी'कडून सहा ड्रग्ज तस्करांना अटक

एनसीबीची मोठी कारवाई, १५ हजार एलएसडी ड्रग पाऊच जप्त

नार्कोटिक कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) मंगळवार, ६ जून रोजी सहा अंमलीपदार्थ तस्करांना अटक केली. त्यांच्याकडून १५  हजार एलएसडी ड्रग पाऊच जप्त करण्यात आले. एनसीबीने गेल्या २० वर्षांत केलेली ही सर्वात मोठी जप्ती आहे. अटक करण्यात आलेले तस्कर हे डार्क वेबच्या माध्यमातून व्यवहार करायचे. त्याचबरोबर ड्रग्सची डिलिव्हरी कुरिअर सेवेद्वारे केली जात होती.

यासंदर्भात डेप्युटी डीजी ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितले की, संशयितांच्या सांगण्यावरून २.५ किलो गांजा आणि ४.६५ लाख रुपये रोख देखील जप्त करण्यात आले आहेत. त्याचबरोबर त्यांच्या बँक खात्यातून २० लाख रुपयेही जप्त करण्यात आले आहेत. एलएसडी हे सिंथेटिक औषध आहे, जे खूप धोकादायक आहे. व्यावसायिक वापरासाठी या औषधाच्या फक्त ०.१ ग्रॅमला परवानगी आहे. तस्करांकडून जप्त करण्यात आलेल्या एलएसडीचे प्रमाण व्यावसायिकरित्या वापरल्या जाणाऱ्या अंमली पदार्थापेक्षा अडीच हजार पट अधिक आहे.

यापूर्वी, कर्नाटक पोलीस आणि कोलकाता एनसीबीने २०२१- २०२२ मध्ये एकाच ऑपरेशनमध्ये एलएसडीची सर्वात मोठी जप्ती केली होती, ज्यामध्ये ५ हजार पाउच सापडले होते. हे नेटवर्क पोलंड, नेदरलँड, यूएसए, दिल्ली-एनसीआर, राजस्थान, महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशमध्ये पसरले होते. दिल्ली झोनल टीमने अनेक युनिटच्या मदतीने या टोळीचा पर्दाफाश केला. या प्रकरणात अटक करण्यात आलेले सर्व संशयित हे सर्व व्यवहार व्हर्चुअली करत असत. ते प्रायव्हेट मेसेजिंग ऍप्सद्वारे सौद्यांची बोलणी करत असत. त्यांनी व्यवहारांसाठी क्रिप्टोकरन्सी आणि डार्कनेटचा वापर केला.

हे ही वाचा:

गोराईत होणार छत्रपती शिवरायांचे वॉर म्युझियम

गेमिंग ऍपच्या माध्यमातून धर्मांतर करण्याचा घाट, पोलिसांनी केला पर्दाफाश

नौदलाच्या हेवीवेट टोर्पेडोने पाण्याखालील लक्ष्य अचूक वेधले

दुर्गा देवीवरील अभद्र टिप्पणीबाबत उच्च न्यायालयाने कान उपटले

ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितले की, एलएसडी तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे. या नेटवर्कमध्ये सामील असलेले बहुतेक लोक सुशिक्षित आणि तरुण आहेत. २०२१ च्या सुरुवातीला, आम्ही ड्रग तस्करी प्रकरणात ४० आरोपींना अटक केली आणि तीन डार्क नेट साइट्सचा भंडाफोड केला. उत्तरप्रदेशच्या बरेली पोलिसांनी १.८ कोटी रुपयांच्या ड्रग्जसह एका तस्कराला ताब्यात घेतले. हा ड्रग्ज स्मगलर उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये ड्रग्जची तस्करी करतो. या टोळीत इतर लोकांचाही सहभाग आहे.

Exit mobile version