30 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरक्राईमनामाचॉकलेटमधून आणलेला गांजा पोलिसांनी घेतला ताब्यात

चॉकलेटमधून आणलेला गांजा पोलिसांनी घेतला ताब्यात

Google News Follow

Related

केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) मुंबई आणि गोव्यात चार ठिकाणाहून वेगवेगळे अमली पदार्थ जप्त केले. या कारवाईत कॅनडातून कुरिअरद्वारे आलेला उच्च प्रतीचा गांजा एनसीबीने हस्तगत केला आहे. एनसीबीने या प्रकरणात एका नायजेरियन नागरिकासह चार जणांना अटक केली. एनसीबीने  हेरॉईन, एलएसडी, कोकेन, कोडेन सीरप आदी अमली पदार्थ जप्त केले आहेत.

परदेशातून कुरिअरद्वारे उच्च प्रतीच्या गांजाची तस्करी केली जात असल्याची माहिती एनसीबीच्या पथकाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार एनसीबीने बलार्ड पिअर येथील फॉरेन पोस्ट ऑफिस येथे शोध मोहीम राबवली आणि दरम्यान एनसीबीला कॅनडाहून आलेल्या एका पार्सलमधून ६० ग्रॅम गांजा सापडला. हा गांजा चॉकलेटमधून लपवून आणला होता. त्याच्या एका ग्रॅमची किंमत पाच ते आठ हजार असल्याचे एनसीबीच्या तपासातून समोर आले आहे.

हे ही वाचा:

शरद पवारांचा ‘हा’ कांगावा आता फोल ठरणार

अफगाणिस्तानमध्ये ‘लोकशाही’ची गळचेपी; पत्रकाराला नाक घासायला लावले

बर्लिन, हाँगकाँग, अमेरिकेत गणपतीचे स्वागत होणार ढोल ताशांच्या गजरात!

कोकणात चाकरमान्यांची गर्दी; नोंदणीसाठी खोळंबा

एनसीबीच्या पथकाने भायकळा भागात छापा मारून अन्य एक कारवाई केली. या कारवाई दरम्यान एनसीबीने मोहम्मद नासीर सैफुर रेहमान खान याच्या घरातून २७ किलो कोडेन सीरप हस्तगत केले. त्यावेळीच खानसह मोहम्मद सलमान खान यालाही अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीतून अजय नागराज या तस्कराचे नाव समोर आले. त्यानंतर पथकाने नागराजच्या माझगावमधील घरी छापा मारला असता ७.५ किलो कोडेन सीरप, १०५ ग्रॅम हेरॉईन, २५० ग्रॅम गांजा हस्तगत केला. एनसीबीने नागराज याला अटक केली.

उत्तर गोव्यात एक नायजेरियन नागरिक अमली पदार्थाची तस्करी करत असल्याची माहिती एनसीबी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून डेविड उर्फ इजे चुक्वेबुका जोशुआ याला उत्तर गोव्यातून अटक केली. यावेळी त्याच्याकडे एलएसडी आणि कोकेन आढळून आले, अशी माहिती एनसीबीचे विभागीय संचालाक समीर वानखेडे यांनी दिली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा