ड्रग्स तस्करांनी केला एनसीबी अधिकाऱ्यांवरच हल्ला

ड्रग्स तस्करांनी केला एनसीबी अधिकाऱ्यांवरच हल्ला

ड्रग्स प्रकरणातील कारवाईतून अमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) १ कोटी किमतीचे अमलीपदार्थ जप्त केले आहेत. या कारवाईदरम्यान एनसीबीच्या पथकावर ड्रग्स तस्करांनी हल्ला केला.

यात पाच एनसीबीचे अधिकारी जखमी झाले आहेत. कारवाईदरम्यान एका नायजेरियन नागरिकाला अटक झाली असून एक कोटींचे अमलीपदार्थ जप्त करण्यात आले.

मानखुर्द येथील खाडी नजीकच्या जंगलात नायजेरियन टोळी मुंबईतील तस्करांना अमलीपदार्थ विकत असल्याची माहिती एनसीबीच्या पथकाला मिळाली होती. संध्याकाळी सात ते दहा या वेळेत त्यांचा धंदा चालत असे. खात्रीलायक माहितीच्या आधारे एनसीबीच्या पथकाने गुरुवारी रात्री या टोळीला पकडण्यासाठी सापळा रचला होता. यावेळी नायजेरियन टोळीने त्यांच्याकडील हत्यारांनी आणि दगड फेकून एनसीबीच्या पथकावर हल्ला केला.

हे ही वाचा:

अखंड भारत संकल्पदिनाला मोदींनी केले ‘हे’ ट्विट

महाग पेट्रोलवर हा नवा पर्याय येणार

अखंड भारत संकल्प दिन म्हणजे नेमके काय रे भाऊ?

पर्यावरण संरक्षणासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

नायजेरियन टोळीने केलेल्या हल्ल्यात एनसीबीचे अधिकारी श्रीकांत राउत हे गंभीर जखमी झाले. तसेच अमोल मोरे, प्रमोद मोरे, किरण रेवलकर आणि समीर साळेकर हे अधिकारीही जखमी झाले. कारवाईदरम्यान रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन टोळीतील पाच जण फरार झाले तर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी ओबीराह एकवेलर या नायजेरियन नागरिकाला अटक केली. त्याच्याकडून २५४ ग्रॅम हिरोईन, ५४ ग्रॅम एमडी आणि ७.५ ग्रॅम कोकेन हस्तगत केले. फरार आरोपींचाही शोध सुरू आहे, अशी माहिती एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दिली.

Exit mobile version