26 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरक्राईमनामामुंबई विमानतळावर महिलेकडून कोकेन जप्त

मुंबई विमानतळावर महिलेकडून कोकेन जप्त

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची कामगिरी

Google News Follow

Related

नॉर्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला मोठे यश मिळाले आहे. एनसीबी मुंबईने मुंबई विमानतळावर बोलिव्हियन महिलेकडून ब्लॅक कोकेन जप्त केले आहे. हे कोकेन ३.५ किलो वजनाचे आहे. गोव्यातील एका नायजेरियन नागरिकालाही या संदर्भात अटक करण्यात आली आहे. ही खेप ब्राझीलमधून भारतात आली होती. तीन दिवस चाललेल्या या कारवाईत विविध शहरांतून अनेकांना अटकही करण्यात आली आहे.

एनसीबीचे म्हणणे आहे की दक्षिण अमेरिकन नागरिक कोकेनची खेप घेऊन विमानाने मुंबईला पोहोचणार होते हे कोकेन पुढे मुंबई आणि लगतच्या राज्यांमध्ये पाठवली जाणार होते. एनसीबीने एक या माहितीची तातडीने दखल घेतली ब्राझील ते गोवा असा प्रवास अदिस अबाबा आणि मुंबई येथे एका बोलिव्हियन महिलेने प्रवास केल्याची ओळख पटली. एनसीबी मुंबईचे अधिकारी मुंबई विमानतळावर रवाना झाले आणि बोलिव्हियन महिलेची शारीरिक ओळख पटवण्यासाठी तिचे निरीक्षण करण्यात आले.

विमान मुंबईत आल्यानंतर त्या महिलेची ओळख पटली जी गोव्याला जाणाऱ्या कनेक्टिंग फ्लाइटमध्ये बसण्याच्या प्रयत्नात होती चौकशी केली असता ती त्याला समाधानकारक उत्तरे देऊ शकली नाही. तिच्या सामानाची सखोल झडती घेतली असता तिच्याकडून १२ पॅकेट जप्त करण्यात आले. पाकिटे तपासली असता काळ्या रंगाचा पदार्थ आढळून आला. महिलेची चौकशी हे ब्लॅक कोकेन असून ते गोव्यातील परदेशी रिसीव्हरला पोहोचवायचे होते असे कबुल केले.

हे ही वाचा:

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल दिसणार नव्या रुपात

नवरात्र २०२२ : परशुराम माता, रेणुकादेवीची कथा

कोकण विभागाकडून ११४ शेतकऱ्यांना पर्यटन प्रमाणपत्र  

डीए वाढला; सरकारची केंद्रीय कर्मचाऱ्यांना भेट

गोव्याच्या हॉटेलात रचला सापळा

एनसीबीने गोव्यातील व्यक्तीला पकडण्यासाठी गोव्यातील एका हॉटेलमध्ये सापळा रचला आणि नायजेरियन व्यक्तीला पकडण्यात आले. नायजेरियन व्यक्तीने आंतरराष्ट्रीय ड्रग सिंडिकेटचा भाग असल्याची कबुली दिली. हा नायजेरियन व्यक्ती ड्रग ट्रॅफिकर असून तो गोव्यात राहून विविध राज्यांतील विविध व्यापाऱ्यांना ड्रग्जचा पुरवठा करत होता. एनसीबी आता पुढील तपस करत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा