एनसीबी मुंबईने केलेल्या एका धडक कारवाईत बांद्रा- कुर्ला विभागातून काही तस्करांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १०९.८ ग्रॅम मेफेड्रोन सुमारे ७७ लाख रुपये रोख, त्याशिवाय जवळपास अर्धा किलो सोन्याचे सुमारे २९ लाख रुपयांचे दागिने इतका मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास चालू आहे.
एनसीबीने (राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी पथक) त्यांना माहिती मिळाल्यानंतर एलबीएस रोड, बोरी कब्रिस्तान, पालिद खाडी, पत्रेवाली चाळ कुर्ला (पश्चिम) येथे सापळा लावला. या सापळ्यात त्यांनी दोन तस्करांना अटक केली. शाहनवाझ शहिद खान आणि आलम नईम खान यांना दोघांना अटक करण्यात आली. त्यावेळी त्यांच्याकडून ५६ ग्रॅम मेफेड्रोन, ४ लाख २० हजार रुपये रोख इतका मुद्देमाल १८ जुलै रोजी ताब्यात घेतला.
हे ही वाचा:
…हे तर मुंबईवर बेतलेल्या संकटाचे संकेत
भरदिवसा वकिलावर तलवारीने वार; दहिसरमध्ये कायदा सुवस्थेचे तीन तेरा!
आरोप बिनबुडाचे! भारतात कोणाचीही हेरगिरी नाही
त्यांची प्राथमिक चौकशी केल्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार एका संशयित महिलेच्या घरावर छापा मारला. या छाप्यात ५३.८ मेफेड्रोन ७३ लाख ७२ हजार रुपये रोख आणि ५८५.५ ग्रॅम सोन्याचे २९.४ लाख रुपये किमतीचे दागिने इतका माल बांद्रा पश्चिम येथे हस्तगत केला. १८ आणि १९ जुलैच्या मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर एनसीबीने रवी अर्हान मेमन या तस्कराच्या घरावर देखील छापा मारला होता.
या प्रकरणाची चौकशी करताना स्थानिक रहिवाशांकडून या प्रकरणाच्या काही तक्रारी यापूर्वी केल्या गेल्या असल्याचे समोर आले आहे. या टोळीकडून तरूणांना व्यसनाधीन करण्याचे संघटीत प्रयत्न चालू असल्याची तक्रार यापूर्वी देखील दाखल करण्यात आली होती. या टोळीच्या म्होरक्या २ महिला होत्या आणि त्यांच्या हाताखाली अनेक तस्कर कार्यरत होते. ते बांद्रा, बीकेसी आणि कुर्ला शिवाय अनेक भागांत अंमली पदार्थांची तस्करी करत होते.