मुंबई एनसीबीच्या पथकाने जळगावमध्ये धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केला आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. कारवाईमध्ये एनसीबीने तब्बल १५०० किलो गांजा जप्त केल्याची माहिती ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिली आहे.
Maharashtra: Mumbai NCB team seized 1500 kgs of Ganja near Erandol in Jalgaon district; two people apprehended for questioning. The Ganja was being brought from Visakhapatnam, Andhra Pradesh. pic.twitter.com/JagGQpMiXP
— ANI (@ANI) November 15, 2021
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल गावाजवळ एनसीबीच्या पथकाने १५०० किलो गांजा जप्त केला आहे. आंध्रप्रदेश येथून अमलीपदार्थांची वाहतूक होणार असल्याची खबर एनसीबीला मिळाली होती. हा गांजा आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून आणण्यात आला होता.
एनसीबीने या कारवाई दरम्यान ट्रक पकडला असून या ट्रकमध्ये तब्बल ४९ पोत्यात जवळपास एक टन गांजा जप्त करण्यात आला. ट्रक ड्रायव्हर आणि अन्य एकाला एनसीबीने ताब्यात घेतले. सध्या या दोघांचीही चौकशी सुरु असून एनसीबीकडून पुढील तपास सुरू आहे.
हे ही वाचा:
शिवशाहिरांच्या अंत्यदर्शनाला अलोट गर्दी, नियोजनाला सरसावले संघ स्वयंसेवक
अनिल देशमुख २९ नोव्हेंबरपर्यंत कोठडीतच
हिंदू खलनायक दाखवले जातात तेंव्हा असे प्रश्न का पडत नाहीत?
बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनावर शरद पवारांची वादग्रस्त प्रतिक्रिया
राज्यभरात एनसीबीच्या आणि पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी कारवायांनी सध्या जोर पकडला असून काही दिवसांपूर्वीच श्रीनगरमधून २४ किलो चरस मुंबईला पुरवणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली होती. या टोळीकडून पोलिसांनी १४ कोटी ४० हजार किंमतीचा २४ किलो चरस जप्त केला होता.