भिवंडीतून नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या ८ हजार ६४० कफ सिरपच्या बाटल्या जप्त

भिवंडीतून नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या ८ हजार ६४० कफ सिरपच्या बाटल्या जप्त

मुंबईत रविवार, २२ मे रोजी भिवंडीमध्ये एनसीबीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. एनसीबीच्या मुंबई युनिटने भिवंडी परिसरातून नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या कफ सिरपचा मोठा साठा जप्त केला आहे. ८ हजारहून अधिक बाटल्या या कारवाईत जप्त करण्यात आल्या आहेत.

मुंबईतील भिवंडी परिसरात एनसीबीच्या मुंबई युनिटने नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या ८ हजार ६४० कफ सिरपच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. ही कारवाई करत असताना एनसबीने दोन जणांना अटक केली आहे. भिवंडीजवळ आग्रा- मुंबई महामार्गावर हा साठा एका गाडीतून येणार असल्याची गुप्त माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यानुसार एका संशयित बोलेरो पिकअपची एनसीबी अधिकाऱ्यांनी झडती घेतली.

हे ही वाचा:

… म्हणून इम्रान खान यांनी भारतावर उधळली स्तुतीसुमने

राज यांचा शरद पवारांना टोमणा आणि मोदींना विनंती

‘उद्धव ठाकरेंच्या अंगावर एक तरी आंदोलनाची केस आहे का?’

लेसबियन एलिमेंट: गरज, अपरिहार्यता की पब्लिसिटी स्ट्रॅटेजी?

या वाहनामधून ६० बॉक्समध्ये एकूण ८६४ किलो (८,६४० बाटल्या) कोडीन आधारित कफ सिरप भरलेले आढळले. जप्त केलेल्या या मालमत्तेची एकूण किंमत ३५ लाख रुपये आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात असून एनसीबीकडून पुढील तपास सुरू आहे. अचानक इतका मोठा साठा इथे का आणला गेला आणि कोणी कोणासाठी पाठवला यासाठी तपास सुरू आहे.

Exit mobile version