मुंबईत एनसीबीची मोठी कारवाई, दीड कोटींचे ड्रग्ज जप्त

मुंबईत एनसीबीची मोठी कारवाई, दीड कोटींचे ड्रग्ज जप्त

मुंबईत एनसीबीने मोठी कारवाई केली आहे. एनसीबीच्या पथकाने धाड टाकून तब्बल दीड कोटी किमतीचे ड्रग्ज जप्त केले आहे. या कारवाईत एनसीबीने एका सराईत ड्रग तस्कराला अटक केली आहे. या तस्करीत आणखी काही लोक असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अटक केलेल्या आरोपीकडे चौकशी करण्यात येत असून, त्याने दिलेल्या माहितीवरून इतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. तस्करीचे हे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी अटक केलेल्या आरोपीकडील मोबाइल जप्त करण्यात आला आहे. एनसीबीने दोन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवायांमध्ये हा ड्रग्जसाठा जप्त केला आहे.

शुक्रवार, १३ मे रोजी रात्री उशिरा एनसीबीने ही कारवाई केली आहे. या कारवाईत १ किलो ७७० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर अमित घावटे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. मुंबई एनसीबीने ही धडक कारवाई करून दीड कोटी रुपये किंमतीचे ड्रग्ज जप्त केले आहे. दोन वेगवेगळ्या ठिकाणी या कारवाया करण्यात आल्या.

हे ही वाचा:

चारधामचे व्हीआयपी दर्शन आता बंद

सह्याद्रीचा कडा, श्वास रोखूनी खडा! आला सरसेनापती हंबीररावचा जबरदस्त ट्रेलर

‘पाणी पाजण्याच्या बाता मारण्यापेक्षा शिवसनेने मुंबईकरांना पिण्याचं शुद्ध पाणी द्यावं’

त्रिपुराचे मुख्यमंत्री बदलणार! विपलब देब यांचा राजीनामा

पहिल्या ठिकाणी एनसीबीच्या पथकाने विदेशी टपाल कार्यालयातून अमेरिकेतून पाठवण्यात आलेले पार्सल जप्त केले. त्या पार्सलमध्ये ८५० ग्रॅम गांजा होता. या कारवाईत आरोपीला अटक करण्यात आली आहे. चौकशीत आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती मिळाली आहे. त्याच्याविरोधात १० गुन्हे दाखल आहेत. तर दुसऱ्या कारवाईत एनसीबीने ९२० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. ते पार्सलही अमेरिकेतून पाठवण्यात आले होते. फॉरेन पोस्ट ऑफिसमधून ते जप्त करण्यात आले.

Exit mobile version