गेल्या काही काळापासून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबी अमली पदार्थ विरोधी मोहीम जोरदारपणे राबवताना दिसत आहे. मुंबई येथील कॉर्डीला क्रूज ड्रग्स पार्टीनंतर आता बॉलीवूडशी संबंधित आणखीन एका मोठ्या व्यक्तीवर एनसीबीने धाड टाकली आहे. बॉलीवूड चित्रपट निर्माते इम्तियाज खत्री याच्या घरावर आणि कार्यालयावर एनसीबीने छापेमारी केली आहे. त्यामुळे बॉलीवूडचे ड्रग्स कनेक्शन पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
गेल्या आठवड्यात २ ऑक्टोबर रोजी एनसीबीने मुंबई येथे कॉर्डीला या क्रूज वर छापेमारी करत ड्रग्स पार्टी उधळून लावली. या मध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासहित आठ जणांना ताब्यात घेण्यात आले. तर कोकेन, चरस, एमडी ड्रग्स सारखे अमली पदार्थही जप्त करण्यात आले. सध्या हे सर्वजण न्यायालयीन कोठडीत आहेत. या पार्टीत अटक करण्यात आलेल्या असीत कुमार नामक एका इसमाच्या चौकशीतून बॉलिवूड चित्रपट निर्माता इम्तियाज खत्री याचे नाव समोर आले. या आधारावरच इम्तियाज खत्री याच्या घरावर आणि कार्यालयावर छापे घालण्यात आले आहेत.
हे ही वाचा:
चिपी विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी होणार राजकीय उड्डाण?
रतन टाटांनी केले मोदी सरकारच्या धोरणांचे कौतुक
वसुली म्हटली की ‘ससा’ आणि शेतकऱ्यांना मदत म्हटल्यावर ‘कासव’…असे हे ठाकरे सरकार!
अफगाणिस्तानात शिया मशीद बॉम्बस्फोटात ५० बळी
काल रात्रीपासूनच हि कारवाई सुरु असल्याचे समजते. खात्री याच्या वांद्रे येथील निवासस्थानी एनसीबी अधिकाऱ्याने छापे घातले. तर या कारवाई नंतर इम्तियाज खात्री याला एनसीबीने समन्स पाठवल्याची माहिती पुढे येत आहे. आज मुंबई येथील एनसीबीच्या कार्यालयात हजर राहण्यासाठी खत्री याला समन्स बजावण्यात आले आहे. या आधी सुशांत सिंग राजपूत प्रकरणातही खत्री याचे नाव पुढे आले होते.