मुंबईहून गोवा कडे निघालेल्या क्रूझवर रंगलेल्या पार्टीत नार्कोटिक्स ब्युरोचे अधिकारी शिरले आणि या पार्टीला भरलेला रंग उतरला. भरसमुद्रात रंगलेल्या क्रूझवरील रेव्ह पार्टीत क्रूझवर उपस्थित असलेल्या एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करून एकाला ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर येत आहे. या पार्टीत बडे उद्योगपतींच्या मुले आणि काही बॉलिवूड कलाकार असल्याची माहिती समोर येत आहे. ही कारवाई शनिवारी दुपारी भरसमुद्रात करण्यात आली आहे.
एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी मुंबई बंदरातून गोवा येथे जाणाऱ्या क्रूझ मध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्स आणण्यात आले असून भरसमुद्रात रेव्ह पार्टी सुरू होणार आहे अशी माहिती एनसीबीला मिळाली होती. या माहितीच्या अनुषंगाने एनसीबीचे मुंबई विभाग संचालक समीर वानखेडे हे आपल्या पथकासह या क्रूझवर हजर होते.
एनसीबीचे पथक क्रूझवर होणाऱ्या पार्टीवर नजर ठेवून असताना भरसमुद्रात क्रूझ दाखल होताच हळूहळू पार्टीला रंग चढू लागला. या पार्टीत मोठ्या प्रमानात ड्रग्स घेतले जात असल्याचे कळताच एनसीबीने रंगलेल्या पार्टीत छापा टाकून अमली पदार्थ (ड्रग्स) जप्त करून एकाला ताब्यात घेतले.
हे ही वाचा:
कोस्टल रोडच्या कामात भ्रष्टाचाराचा तवंग
अफगाणिस्तान सीमेवर आत्मघातकी हल्लेखोर तैनात
एनसीबीच्या ताब्यात बॉलीवूड अभिनेत्याचा मुलगा?
तुमच्या राजकारणापायी शेतकऱ्यांचा बळी देऊ नका
सूत्रांच्या म्हणण्यानुसार या क्रूझवरील पार्टीत अनेक बॉलिवूड कलाकार हजर होते मात्र त्यांची नावे एनसीबीकडून उघड करण्यात आलेली नाही. हे क्रूझ शनिवारी मुंबईतून गोवा च्या दिशेने निघून पुन्हा सोमवारी मुंबईत बंदरात दाखल होणार होते.