एनसीबी संचालक वानखेडे यांच्या मागावर गुप्तहेर

एनसीबी संचालक वानखेडे यांच्या मागावर गुप्तहेर

पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार दाखल

नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या मागावर गुप्तहेर लावण्यात आले आहे. समीर वानखेडे कुठे जातात, काय करतात याच्यावर गुप्तहेरांचे लक्ष असून त्यांच्या पाळतीवर असणाऱ्या गुप्तहेराचे पुरावे वानखेडे यांनी राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुंबईच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याकडे सादर केले आहे.

समीर वानखेडे हे एनसीबी या केंद्रीय तपास यंत्रणाचे मुंबई विभागाचे संचालक आहेत. मागील वर्षभरापासून वानखेडे यांनी बॉलिवूड संबंधित तसेच ड्रग्स माफिया यांच्या विरोधात रण छेडले आहे. मध्यतरी वानखेडे यांनी एका राजकीय पक्षाच्या नातेवाईकाला देखील अटक केली आहे. या सर्व कारवाई नंतर समीर वानखेडे हे ड्रग्स माफियांच्या नजरेत आले आहे. त्यातच त्यानी नुकतीच कॉर्डिलिया या क्रूझवर कारवाई करून बॉलिवूड मधील सुपरस्टार शाहरुख खान याच्या मुलाला अटक केली आहे. या कारवाई नंतर समीर वानखेडे अधिक चर्चेत आले असून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन एनसीबीच्या कारवाईवर संशय व्यक्त केला आहे.

दरम्यान, एनसीबीचे संचालक समीर वानखेडे हे दररोज कब्रस्तानात मध्ये आईच्या थडग्यावर फुले वाहण्यासाठी आणि दर्शनासाठी जातात, त्यावेळी काही व्यक्ती त्यांचा पाठलाग करीत असल्याचा संशय वानखेडे यांना असून हे व्यक्ती पोलीस कर्मचाऱ्यांसारखे दिसतात व आपला पाठलाग का करीत आहे याचा संदर्भ वानखेडे यांना लागलेला नसून त्यांनी कब्रस्तान मधील सीसीटीव्ही मध्ये तपासले असता काही व्यक्ती त्यांचा पाठलाग करीत असल्याचे लक्षात आले.

 

हे ही वाचा:

ठाकरे सरकार विरोधात शेतकऱ्यांचा अन्नत्याग

वर्षभरात एसटीच्या २३ कर्मचाऱ्यांनी केली आत्महत्या

काय आहे मोदी सरकारने सुरु केलेली आयएसपीए?

‘अमलीपदार्थांच्या संकटाशी लढण्यासाठी मोदी सरकार वचनबद्ध’

 

वानखेडे यांनी हे सीसीटीव्ही फुटेज घेऊन राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे आणि मुंबई पोलीस दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याची भेट घेऊन त्यांना दिले आहे. तसेच पाठलाग करणाऱ्या व्यक्ती कोण आहे त्यांचा उद्देश काय आहे याबाबत तक्रार दाखल केली आहे. मुंबईत सुरू असलेल्या कारवाई नंतर समीर वानखेडे यांच्यावर पाळत ठेवण्यात येत असू शकते त्यांचा माग काढला जात असल्याचे संशय व्यक्त करण्यात येत आहे.

वानखेडे यांचे कॉल रेकॉर्डस मुंबई पोलिसांनी तपासावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मागे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली होती.

Exit mobile version