…आणि आर्यन खानसोबत सेल्फी काढण्याचा मोह अधिकाऱ्यालाही आवरला नाही!

…आणि आर्यन खानसोबत सेल्फी काढण्याचा मोह अधिकाऱ्यालाही आवरला नाही!

अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अमलीपदार्थ प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्यानंतर सगळीकडे या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.

एवढे गंभीर प्रकरण असतानाही त्यातले गांभीर्य न ओळखता एका अधिकाऱ्याने आर्यन खानसोबत सेल्फी काढला आहे. हा फोटो व्हायरल झाला आहे.

एनसीबीच्या माध्यमातून शनिवारी रात्री मुंबई गोवा असा प्रवास करणाऱ्या एका क्रूझवर छापेमारी करत तिथे ड्रग्सचा वापर केला जात असल्याचे उघड केले. त्यात आठ जणांना ताब्यात घेतले. त्यात आर्यनचा समावेश होता. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी सुरू झाली आहे. शाहरुखचा मुलगा असल्याने या अधिकाऱ्याला मात्र सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही.

कुस्तीगीर सुशील कुमारला मागे अटक झाल्यानंतर त्याच्यासोबतही पोलिसांनी फोटो काढला होता आणि त्या फोटोची बरीच चर्चा झाली होती. आपण कुणासोबत फोटो काढतो आहोत, याचे भानही बाळगले जात नसल्याबद्दल आता टीका होऊ लागली आहे.

 

हे ही वाचा:

न भेटणाऱ्या मुख्यमंत्र्यांसाठी संतप्त शेतकऱ्यांची विशेष भेट

उलट्या मार्गाने जाणाऱ्या १३० दुचाकीस्वारांना पोलिस रोज करताहेत सरळ

शाहरुखपुत्र आर्यन खान क्रूझवर होता हे ‘कन्फर्म’; आठ जणांना घेतले ताब्यात

लोखंडवाला, मुर्गन चाळ हे अमलीपदार्थ तस्करांचे अड्डे!

 

काही दिवसांपूर्वी एनसीबीला मुंबई येथे होऊ घातलेल्या एका रेव्ह पार्टीची माहिती मिळाली होती. ही माहिती कळताच एनसीबीने कारवाई करण्यासाठी सापळा रचला. एनसीबीचे काही अधिकारी बनावट ओळख धारण करून ग्राहक म्हणून या पार्टीत शिरले. नंतर ही क्रूज शिप समुद्रात गेली. ही क्रूज गोव्याच्या दिशेने जाणार होती.

या पार्टीत अनेक बड्या घरातली लोक सामील झाली होती. क्रूज समुद्रातून निघाल्यावर या पार्टीत काही जणांनी ड्रग्स सेवन करायला सुरुवात केली. हे लक्षात आल्यावर लगेचच एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी आपल्या धडक कारवाईला सुरुवात केली असून सर्वांना रंगेहात पकडले.

Exit mobile version