30 C
Mumbai
Wednesday, January 1, 2025
घरक्राईमनामामहिलेची छेड काढणाऱ्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधीक्षकाला अटक

महिलेची छेड काढणाऱ्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधीक्षकाला अटक

Google News Follow

Related

नवी मुंबईत राहणाऱ्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो च्या अधिक्षकाला २५ वर्षीय प्रवासी महिलेची प्रवासादरम्यान छेड काढून तिच्या अंतर्वस्त्रासोबत विकृत चाळे केल्याप्रकरणी अधिक्षक दिनेश चव्हाण याला अटक करण्यात आली आहे.

उदगीर लातूर रोड दरम्यान ही घटना घडली. हैदराबाद – हडपसर रेल्वे गाडीत रात्री हा प्रकार गुरुवारी घडला आहे. या आरोपीविरुद्ध परळी येथील जीआरपी पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३५४, ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हैदराबाद पुणे रेल्वेने प्रवास करत असताना या एनसीबी अधिकाऱ्याने या विद्यार्थीनीशी छेडछाड केली. त्यानुसार त्या विद्यार्थीनीने पोलिसांकडे तक्रार केली.

दिनेश चव्हाण हे मागील काही महिन्यांपासून वैद्यकीय रजेवर असल्याची माहिती एनसीबीने दिली आहे. त्यांच्या या मानसिक आजारावर उपचार सुरू असल्याचे एनसीबीने म्हटले आहे.

दिनेश चव्हाण हे न्यायालयीन कामासाठी हैद्राबाद येथे गेले होते.  परतीच्या प्रवासादरम्यान त्यांनी ही छेडछाड केली. परळी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दिनेश चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे.

 

हे ही वाचा:

नरेंद्र मोदींनी मनात आणलं तर क्षणात कोलमडेल पाकिस्तान क्रिकेट

दादर स्थानकाचा होणार कायापालट; ‘हे’ बदल होणार

… म्हणून ९०व्या वर्षी ते बनले सरपंच!

कनिष्ठ नेमबाजी स्पर्धेत महिला संघाची सुवर्णकमाई!

 

महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात महिलांशी गैरवर्तन, बलात्कार, हत्या असे अनेक प्रकार घडल्यानंतर त्याविरोधात संतापाचे वातावरण तयार झाले आहे. अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्याकडून हे वर्तन झाल्यामुळे अधिक संताप व्यक्त केला जात आहे.

पुण्यात तर एका अल्पवयीन मुलीवर अनेकांनी बलात्कार केल्याचे प्रकरण उघड झाले होते तर डोंबिवलीत ३३ जणांनी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकाराने महाराष्ट्रात भीतीचे वातावरण पसरले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा