25 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरक्राईमनामासुशांतसिंह राजपूत प्रकरणात सिद्धार्थ पिठाणीला अटक

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सिद्धार्थ पिठाणीला अटक

Google News Follow

Related

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात अमलीपदार्थ नियंत्रण विभाग अर्थात एनसीबीने सर्वात मोठी कारवाई केली आहे. एनसीबीने सुशांतसिंह राजपूतचा रुममेट आणि मित्र सिद्धार्थ पिठाणी याला अटक केली आहे. सिद्धार्थला हैदराबादेतून अटक करण्यात आली. धक्कादायक म्हणजे सुशांतसिंह राजपूतला ड्रग्ज दिल्याच्या कटात हात असल्याचा आरोप सिद्धार्थ पिठाणीवर आहे. सिद्धार्थला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे.

सुशांत सिंह राजपूतने १४ जून २०२० रोजी आत्महत्या केली केली होती. मात्र, सुशांत आत्महत्या करूच शकत नाही, त्याची हत्या करण्यात आल्याचा दावा त्याच्या कुटुंबाने केला होता. सुशांतच्या चाहत्यांनीही त्याची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करत, त्याला न्याय मिळावा म्हणून सोशल मीडियावर अनेक मोहिमा राबवल्या होत्या. यानंतर सुशांत आत्महत्या प्रकरण, हत्येच्या संशयामुळे सीबीआयकडे सोपवण्यात आले होते. मात्र सुशांतने आत्महत्या केल्याचं तपासात उघड झालं होतं.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सुरु झालेल्या सीबीआय चौकशीत सिद्धार्थ पिठानीने सुशांतची बहीण मितू सिंह, प्रियंका, तिचे पती ओपी सिंह या तिघांची नावं घेतली होती. मितू आणि प्रियंका यांना १४ तारखेला फोनवर सुशांतच्या आत्महत्येबाबत माहिती दिल्याचा दावा सिद्धार्थ पिठानीने केला होता. प्रियंका आणि मितू यांच्या सांगण्यावरुन सुशांतचा मृतदेह फासावरुन खाली उतरवल्याचे देखील सिद्धार्थने सांगितले होते. दीपेशने चाकूने पंख्याला लागलेला दोर कापला होता, तर आपण मृतदेह खाली काढला, असे सिद्धार्थने सीबीआयला सांगितले होते.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि त्याची गर्लफ्रेंड- अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांच्यामध्ये ८ जूनला कडाक्याचे भांडण झाले होते, त्यानंतर आयटी प्रोफेशनलला बोलावून सुशांतच्या घरातील ८ हार्ड डिस्क नष्ट करण्यात आली, अशी माहिती सीबीआयने सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणी याच्या केलेल्या चौकशीत समोर आली होती. हार्ड डिस्कमध्ये सुशांत आणि रियाच्या कुटुंबाच्या परदेश दौऱ्याचे फोटो यामध्ये असल्याचा संशय देखील व्यक्त करण्यात आला होता. तसेच दोघांच्या कंपन्यांचे महत्त्वाचे कागदपत्रही हार्ड डिस्कमध्ये होते, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती.

हे ही वाचा:

असं काय काळंबेरं आहे जे हे वसुली सरकार लपवू इच्छित आहे

आजच्या आज मराठा तरुणांच्या नियुक्तीचे आदेश काढा

नेते, सेलिब्रिटींकडे वाटण्यासाठी औषध कसं आणि कुठून येतं?- उच्च न्यायालय

४४ दिवसांमधील सर्वात कमी रुग्ण

तीन आयटी प्रोफेशनल्सना संपर्क केला गेला होता, एक जण घरी आला होता. माझ्या माहितीप्रमाणे रिया किंवा इतर कुणी बोलावलं असेल. ज्यावेळी डाटा नष्ट केला जात होता, तेव्हा तिथे रिया, सुशांत, दीपेश, नीरज उपस्थित होते, असेही सिद्धार्थ पिठाणी याने सांगितले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा