एनसीबीने केले अंमली पदार्थांचे आंतरराज्यीय जाळे उद्ध्वस्त

डॉक्टरसह ७ जणांना अटक, सिरपच्या ३,१९५ बाटल्या जप्त

एनसीबीने केले अंमली पदार्थांचे आंतरराज्यीय जाळे उद्ध्वस्त

अंमलीपदार्थ विरोधी पथकाने(एनसीबी) मोठी कारवाई केली आहे. नेसीबीने महाराष्ट्र, पंजाब आणि गुजरातमधून सात जणांना अटक करून आंतरराज्यीय अंमली पदार्थांच्या जाळ्याचा पर्दाफाश केला आहे. पकडलेल्या आरोपींच्या ताब्यातून कोडीन बेस्ड कफ सिरपच्या ३,१९५ बाटल्याही जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपींमध्ये गुजरातमधील सुरत शहरातील एका डॉक्टरचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

एनडीपीएस कायद्यांतर्गत समाविष्ट असलेल्या काही बेकायदेशीर औषधांच्या व्यवहारात हे सिंडिकेट सक्रियपणे गुंतले होते असे एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले एनसीबी मुंबई झोनल युनिटच्या अधिकाऱ्यांना मुंबई, ठाणे आणि आसपासच्या परिसरात सीबीसीएस बाटल्यांसह इतर औषधांची बेकायदेशीर विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनंतर एनसीबीचे पथक अलर्ट झाले. त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील एक व्यक्ती अंमली पदार्थांच्या बेकायदेशीर विक्रीत सामील असल्याचे एनसीबीच्या अधिका-यांनी केलेल्या चौकशीत उघड झाले आहे. हि व्यक्ती अवैधरित्या वळवलेल्या ड्रग्सची खेप खरेदी करून व्यापाऱ्यांना विकत होता.एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्याचा ठावठिकाणा आणि कार्यपद्धतीची माहिती गोळा केली.

एनसीबीच्या अधिकाऱ्यांना गुजरातमधील एका व्यक्तीची माहिती मिळाली. हा भिवंडीतील आरोपींना बेकायदेशी सिरपची खेप पुरवत होता. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी भिवंडीत सापळा रचून सीबीसीएस माल घेऊन जाणारे वाहन अडवले. प्राथमिक चौकशीत सिंडिकेट सदस्यांनी दाखवलेली कागदपत्रे बनावट असल्याचे आढळून आले. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी असून झडती घेतली असता सीबीसीएसच्या ३,१९५ बाटल्या असलेले ३२ खोके जप्त करण्यात आले.

हे ही वाचा:

संजय राऊतांना १००० रुपयांचा दंड; आरोप केले पण न्यायालयात हजरच नाही!

बोरिवली रेल्वे स्टेशनवर विनयभंग करणाऱ्या भजन गायकाला अटक

आत्मनिर्भर भारत मोहिमेंतर्गत भारत करणार ५,४०० संरक्षण उत्पादनांची खरेदी

कर्नाटकात एकाच टप्प्यामध्ये होणार निवडणुका

 

गुजरातमधील एक डॉक्टरही जाळ्यात
एनसीबीने दोन्ही मुख्य आरोपींना सिंडिकेटच्या इतर सदस्यांसह अटक केली. तो म्हणाला की मुख्य आरोपींपैकी एक गुजरातचा एमडी-फिजिशियन आहे. डॉक्टरांनी उत्तर भारतातील उत्पादन युनिट्समधून अशी औषधे खरेदी करण्यासाठी एक फर्म स्थापन केली होती असे एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Exit mobile version