एनसीबीने केला आंतरराज्यीय ड्रग्ज टोळीचा भांडाफोड

कोडीन आधारित कफ सिरपची अवैध तस्करी, टोळीच्या म्होरक्यासह पाच तस्करांना अटक

एनसीबीने केला आंतरराज्यीय ड्रग्ज टोळीचा भांडाफोड

मुंबईच्या नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने कोडीन आधारित कफ सिरपची अवैध तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय अंमलीपदार्थ टोळीचा भांडाफोड केला आहे. एनसीबी अधिकाऱ्यांनी एकूण १३ हजार ४४८ बेकायदेशीर सीबीसीएस बाटल्या जप्त केल्या आहेत. त्यांची किंमत ५० लाख रुपये आहे. या टोळीच्या म्होरक्यासह पाच ड्रग्स तस्करांना पकडण्यात आले आहे.

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आंतरराज्य टोळीचे सदस्य बेकायदेशीरपणे कोडीन- आधारित कफ सिरपची तस्करी करत होते. ही टोळी अनेक राज्यात सक्रिय आहे. टोळीच्या म्होरक्यासह पाच तस्करांना अटक करण्यात आली आहे. त्यांची चौकशी सुरू आहे.

हे ही वाचा:

इकबाल कासकरच्या बॉडीगार्डला मारणाऱ्या फरार आरोपीच्या आवळल्या मुसक्या

“उद्धव ठाकरेंनी शिवाजी महाराजांसारखा तह करायला हवा होता”

सिसोदियांसह १३ जणांविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी

बांदीपोरामधून एका दहशतवाद्याच्या आवळल्या मुसक्या

विशेष मिळेलेल्या माहितीच्या आधारे आंतरराज्यीय टोळी विरोधात शुक्रवारी कारवाई करण्यात आली. यावेळी टोळीचे सदस्य, त्यांची भूमिका, कामकाज यावर सातत्याने लक्ष ठेवले जात होते. छाप्या दरम्यान जप्त केलेले अनेक माल उत्तर प्रदेशातील वाराणसीला पाठवले जात होते. बनावट पत्ते आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे ही खेप मुघलसराय ते पुणे येथे बुक करण्यात आली होती, असं एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. अधिका-यांनी सांगितले की, ही खेप पुणे रेल्वे स्थानकावरून प्राप्त केली जात होती आणि नंतर मुंबईला स्थानिक तस्कर आणि पेडलर्सना विविध ठिकाणी पाठवली जात होती.

मेडिकल स्टोअरचा मालक म्होरक्या

या टोळीचा म्होरक्या मुंबईतील अनेक मेडिकल स्टोअर्सचा मालक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हे संपूर्ण नेटवर्क चालवत असल्याची माहिती आहे. या सिंडिकेटमधील बहुतांश सदस्यांना त्याचे नाव, चेहरा, ठिकाण याची माहिती नव्हती असही अधिकाऱ्यांनी सांगितलं.

Exit mobile version