प्रभाकर साईलने त्याचे म्हणणे कोर्टात मांडावे

प्रभाकर साईलने त्याचे म्हणणे कोर्टात मांडावे

रविवार २४ ऑक्टोबर रोजी आर्यन खान ड्रग्स प्रकरणात नवा गौप्यस्फोट झाला आहे. या प्रकरणातील एक महत्वाचा साक्षीदार असणाऱ्या प्रभाकर साईल या इसमाने या प्रकरणात पैशाची देवाण घेवाण झाल्याचे आरोप केले आहेत. या सगळ्या प्रकरणासंदर्भात एक व्हीडिओ करून त्यात २५ कोटींचे ‘डील’ झाल्याचा आरोप त्याने केला आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना त्यात ८ कोटी देण्यात येणार होते, असा आरोपही त्याने केला आहे.

या सर्व प्रकरणात एनसीबीने प्रसिद्धीपत्रक जारी करून आपले म्हणणे मांडले आहे. या प्रसिद्धीपत्रकात एनसीबी असे म्हणताना दिसत आहे की क्रूज ड्रग्स प्रकरणात प्रभाकर साईल हा एक महत्त्वाचा साक्षीदार आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्यामुळे या प्रकरणाशी संबंधित त्याचे जे काही म्हणणे असेल ते त्याने न्यायालयात मांडा. त्या संदर्भात सोशल मीडियातून अशाप्रकारे भाष्य करणे योग्य नाही.

हे ही वाचा:

समीर वानखेडेंना ८ कोटी देण्यात येणार होते… क्रूझ प्रकरणातील पंच साईलचा दावा

ICC Men’s T20 WC: आज कोणाला ‘मौका’?

आर्यन खान प्रकरणात नवा ट्विस्ट…कोण आहे कुणाल जानी?

विद्यार्थी पोहोचले पण परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक, प्रश्नपत्रिकाच नाहीत!

दुसरीकडे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांच्या संदर्भातही एनसीबीकडून खुलासा करण्यात आला आहे. समीर वानखेडे यांनी या प्रकरणातील सर्व आरोपी फेटाळले असले तरी या प्रकरणात पैशाच्या देवाणघेवाणीचे आरोप झाले असल्यामुळे प्रभाकर साईलचे हे प्रतिज्ञापत्र अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांकडे पाठवत आहोत. त्यांनी या प्रकरणात आवश्यक ती कारवाई करावी असे प्रसिद्धीपत्रक एनसीबीचे मुथा अशोक जैन यांनी काढले आहे.

Exit mobile version