एनसीबीने गोठवली १२ कोटींची मालमत्ता

एनसीबीने गोठवली १२ कोटींची मालमत्ता

गेल्या १० महिन्यांत आठ प्रकरणांमध्ये स्मगलर्स अँड फॉरेन एक्सेंज मॅनिप्युलेटर्स (मालमत्ता जप्ती) कायद्या (Safema) अंतर्गत एनसीबीने तब्बल ११.९ कोटी रुपयांची मालमत्ता गोठवली आहे. ही आठ प्रकरणे अशी आहेत ज्यात अमलीपदार्थ विरोधी पथकाने अभिनेत्री रिया चक्रवर्ती, अभिनेता एजाज खान, गौरव दिक्षित यांच्यासह ७६ जणांना अटक केली होती, परंतु कोणत्याही अभिनेत्याची मालमत्ता गोठवण्यात आलेली नाही.

व्यावसायिक प्रमाणात अमलीपदार्थ जप्त केले जातात किंवा १० वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाली असेल अशा प्रकरणांमध्ये मालमत्ता गोठवली जाते, अशी माहिती एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिली आहे. गोठवल्या जाणाऱ्या मालमत्तेची कागदपत्रे प्रथम सक्षम अधिकाऱ्याकडे सादर केली जातात. त्यानंतर महिन्याभराच्या आत दोन्ही पक्षांकडून बाजू मांडली जाते आणि त्यानंतरच मालमत्ता गोठवण्याचे निश्चित केले जाते, अशी माहिती एनसीबी अधिकाऱ्याने दिली आहे.

हे ही वाचा:

सव्वा लाख कोटींची ‘दिवाळी’

अनिल देशमुखांना १२ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी

ड्रग्स प्रकरणात होणार अस्लम शेख यांची चौकशी?

भारत पाक युद्धातील माजी सैनिकाचा नांदेडमध्ये खून

आठ प्रकरणांमध्ये तब्बल ७६ जणांना अटक करण्यात आली असून या यादीत काही अभिनेत्यांचाही समावेश आहे. कोणत्याही अभिनेत्याची वा अभिनेत्रीची मालमत्ता गोठवण्यात आलेली नाही. या वर्षाच्या सुरुवातीला एनसीबीने कारवाई करत डॉन करीम लाला यांचा नातू चिंकू पठाण आणि साथीदार आरिफ भुजवाला यांना अटक करून या प्रकरणात तब्बल ७.२ कोटी रुपयांची मालमत्ता गोठवली आहे. भुजवाला याच्या घरात छापा टाकल्यावर मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले असून इतरही साहित्य सापडले होते.

Exit mobile version