एनसीबी दक्षता समितीच्या हाती लागले काही महत्त्वाचे पुरावे

एनसीबी दक्षता समितीच्या हाती लागले काही महत्त्वाचे पुरावे

कॉर्डिलिया क्रूझ प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने छापेमारी केल्याच्या प्रकरणानंतर आता एनसीबीच्या दक्षता समितीने काही पुरावे हस्तगत केले आहेत. त्यात काही इलेक्ट्रॉनिक पुरावेही ताब्यात घेण्यात आले आहेत. अजून काही महत्वाच्या लोकांना यामध्ये सहभागी करून चौकशी करायची आहे, असे एनसीबीच्या सूत्रांनी सांगितले आहे.

दुसऱ्या चौकशी वेळी ७ साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले असून क्राईम सिनला भेट देऊन नाट्यरूपांतर करण्यात आले. त्यानंतर आम्ही निष्कर्षापर्यंत पोहोचू, असे एनसीबी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. किरण गोसावीची चौकशी करण्यासाठी आम्ही कोर्टात अर्ज केला असल्याचे एनसीबीने म्हटले आहे. सोमवारी त्यावर सुनावणी आहे.

एनसीबीच्या सूत्रांनी सांगितले की, तपासाला हानिकारक होईल असं काहीही आता सांगू शकत नाही. प्रभाकर साईलची दोन दिवस सलग चौकशी करण्यात आली. गरज पडल्यास त्याला पुन्हा बोलावले जाईल. मुंबई पोलिसांना आम्ही विनंती केली होती तपासात सहकार्य करण्यासाठी. काही सीसीटीव्ही आम्हाला मिळालेले आहेत काही मिळायचे आहेत. आतापर्यंत १४ ते १५ लोकांचा जबाब आम्ही नोंदवला आहे. दक्षता पथकाकडून आर्यन खान पूजा ददलानी यांचा जबाब अद्याप नोंदवण्यात आलेला नाही.

मागच्या वेळेपेक्षा यावेळी आमचा तपास वेगवान झाला, कारण यावेळी प्रभाकर साईल याचा जबाब नोंदवून त्याची चौकशी करण्यात आली. आम्ही के पी गोसावी याच्या जबाबाची वाट पाहत आहोत. तो न्यायालयीन कोठडीत गेला की लगेचच आम्ही पुन्हा कोर्टात अर्ज करू आणि त्याची चौकशी करू. गरज पडल्यास समीर वानखेडे यांना पुन्हा चौकशीला बोलावण्यात येईल, असेही एनसीबीच्या सूत्रांनी सांगितले.

 

हे ही वाचा:

मालेगाव, अमरावती आणि नांदेडमध्ये मुस्लिम समुदायाकडून तुफान दगडफेक

बोका हरामी…

पंजाबमधील एसटी चालकाला २५ हजार आणि महाराष्ट्रात फक्त १२ हजार…

मुंबईला पुढे न्यायला भाजपा तत्पर

 

प्रतिज्ञापत्रात ज्यांची नाव होती त्या सगळ्यांना बोलावण्यात येईल. आतापर्यंत अर्ध्यां लोकांना बोलावण्यात आले आहे असे सांगून एनसीबीकडून सांगण्यात आले की, कोणाकडून चूक झाली असेल तर ती समोर येईलच लपणार नाही. आर्यनचा जबाब एनसीबी SIT रेकॉर्ड करत आहे.

Exit mobile version