अभिनेता अरमान कोहलीच्या घरात सापडले ड्रग्स

अभिनेता अरमान कोहलीच्या घरात सापडले ड्रग्स

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) शनिवारी मुंबईतील बॉलिवूड अभिनेता अरमान कोहलीच्या घरावर छापा टाकला. केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाने टीव्ही अभिनेता गौरव दीक्षितच्या अटकेच्या एका दिवसानंतर ही कारवाई केली आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्याने अरमान कोहलीच्या मुंबई येथील घरी छापेमारी सुरू असल्याचे सांगितले.

अरमानने जानी दुश्मन, दुश्मन जमाना, बाजीगर, दिलवाले दुल्हनीया ले जायेंगे या सारख्या बड्या सिनेमात अरमानने महत्वाच्या भूमिका निभावल्या आहेत. याचबरोबर तो बिग बॉसच्या सातव्या सीझनमध्ये देखील सहभागी झाला होता. एनसीबीने सांगितले की, आम्ही शनिवारी एका व्यक्तीला ताब्यात घेतले होते, त्याच्याकडून अरमान कोहलीचे नाव समोर आले. कोहलीच्या घरावर छापा मारल्यानंतर त्याच्या घरात अमली पदार्थ सापडले आहेत. कॉन्ट्राबॅन्ड हे ड्रग्स त्याच्या घरात सापडल्याचे एनसीबीने म्हटले आहे. अरमानची यासंदर्भात चौकशीही करण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईच्या एका कोर्टाने अमली पदार्थाच्या प्रकरणात अटक करण्यात आलेला टीव्ही अभिनेता गौरव दीक्षितला ३० ऑगस्टपर्यंत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची कोठडी सुनावली आहे.

एनसीबी कडून विशेष सरकारी वकील अद्वैत सेठना यांनी सांगितले की, बंदी घातलेल्या औषधाशी संबंधित केस आहे आणि त्यामुळे दीक्षितची आणखी चौकशी करण्याची गरज आहे. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर सुरू झालेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या तपासाने अनेक अभिनेत्यांना आपल्या ताब्यात घेतलं आहे.

हे ही वाचा:

भाविना पटेलने रचला इतिहास! रौप्य पदकावर कोरले नाव

‘पब्जी’तून लाखो गमावणारा मुलगा अखेर सापडला!

राज्यातील ‘आदर्श शिक्षक’ अजूनही पुरस्काराच्या प्रतीक्षेत

मुघलांचे अनौरस वारसदार

आरोपीची बाजू मांडत ऍड. कुशल मोर यांनी युक्तिवाद केला की, दीक्षितला जामिनावर सोडले पाहिजे. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला ३० ऑगस्टपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे. दरम्यान, एप्रिल २०२१ मध्ये अभिनेता एजाज खान आणि काही इतरांच्या चौकशीत दीक्षितचे नाव समोर आल्यानंतर एनसीबी गेल्या काही महिन्यांपासून दीक्षितच्या शोधात होती. तपास यंत्रणेने त्यावेळी दीक्षितच्या लोखंडवाला येथील घराची झडती घेतली होती आणि अंमली पदार्थ जप्त केले होते.

Exit mobile version