छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पाच किलो अमलीपदार्थ जप्त करण्यात आले आहे. केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) केलेल्या कारवाईमध्ये विमानतळाच्या कार्गोमधून चादरीत लपवलेले तब्बल पाच करोड किंमतीचे अमलीपदार्थ जप्त करण्यात आले आहेत. भारतात बनविण्यात आलेले अफेड्रीन आणि मेटाफेतिमाईन हे ड्रग्स कारवाई दरम्यान जप्त करण्यात आले असून मुंबईतून हे अमलीपदार्थ परदेशात पाठवले जात होते. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
अफेड्रीन आणि मेटाफेतिमाईन हे ड्रग्स भारतातील आंध्रप्रदेशमध्ये बनवून मुंबई मार्गे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मध्ये पाठविण्यात येणार होते. अमलीपदार्थ लपवण्यासाठी चादरीचा वापर करण्यात आला होता. चादरीच्या आत अमलीपदार्थाची पट्टी बनवून ती दिसून येणार नाही अशा पद्धतीने लपविण्यात आली होती. या अमलीपदार्थांची किंमत पाच करोड इतकी आहे. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी गेल्या काही दिवसांत केलेली ही पाचवी कारवाई आहे. या पाच कारवाईदरम्यान १० किलो अमलीपदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
हे ही वाचा:
विवेक चौधरी नवे हवाई दल प्रमुख, नांदेडच्या सुपुत्राची गगन भरारी!
शशी थरूरदेखील सिब्बल यांच्या समर्थनार्थ मैदानात
मुंबईत गेल्या एका वर्षात सुमारे १५० कोटी रुपयांचे अमलीपदार्थ जप्त करण्यात आले आहेत आणि कारवाई दरम्यान सुमारे १५० कोटी किमतीचे विविध अमलीपदार्थ जप्त करताना सुमारे ३०० अमलीपदार्थ विक्रेते आणि पुरवठादार पकडले गेले आहेत एनसीबी कडून प्रसिध्द केलेला आकडा ऑगस्ट २०२० ते ऑगस्ट २०२१ पर्यंतचा आहे.