रिटायर्ड एसीपी केंजळे यांच्या मुलाला ड्रग्स प्रकाणात एनसीबीने मंगळवारी अटक केली आहे. त्याच्याजवळून सुमारे ५० लाख रुपये किंमतीचा महागडे ड्रग्स जप्त करण्यात आले असल्याची माहिती एनसीबीने दिली आहे. ही कारवाई गोरेगाव पूर्व या ठिकाणी करण्यात आली आहे.
श्रेयस केंजळे (२४) असे या रिटायर्ड एसीपी पुत्राचे नाव आहे. श्रेयस हा उच्चभ्रू तसेच पार्टी, पब्स या ठिकाणी ड्रग्स पुरवायचा अशी माहिती समोर येत आहे. मंगळवारी एनसीबीच्या पथकाने गोरेगाव पूर्व येथे त्याच्या राहत्या घरी छापा टाकून एलएसडीचे ४३६ ब्लॉट्स तसेच ३००ग्राम उच्च दर्जाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या या ड्रग्सची किंमत सुमारे ५० लाखाच्या जवळपास असल्याची माहिती एनसीबीने दिली आहे.
हे ही वाचा:
दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला एनसीबीकडून अटक
झाड कापण्यासाठी पालिकेचा सोसायटीच्या खिशावर दरोडा
वसई-विरारमधील बांधकाम माफियांना कुणाचा आशीर्वाद?
ओबीसी आरक्षणाकडे ठाकरे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष
या प्रकरणी श्रेयस केंजळे याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीत त्याने हा ड्रग डार्कनेट वरून युरोपियन देशातून खरेदी केले आहे, या एलएसडीची सर्वात अधिक मागणी कॉलेज तरुणांमध्ये असून काही उच्चभ्रू कॉलेज तरुणांना त्याची विक्री करीत असल्याची माहीती त्याने एनसीबीला दिली आहे.
एनसीबी च्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार जप्त करण्यात आलेल्या ड्रग्सची सर्वात अधिक मागणी तरुणांमध्ये अधिक असून हे एलएसडी ब्लॉट युरोपियन देशातून मागवले जातात, या ड्रग्सची खरेदी डार्कनेट वरून मोठ्या प्रमाणात सुरू आहे. एनसीबीने नुकतीच दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर यालाही ड्रग्ज प्रकरणात अटक केली आहे. एकूणच एनसीबीने ड्रग्ज पुरवणाऱ्यांभोवती फास अधिक घट्ट केला आहे.