सकाळी सकाळी एनसीबी अधिकारी धडकले पुन्हा क्रूझवर; आणखी आठ जण ताब्यात!

सकाळी सकाळी एनसीबी अधिकारी धडकले पुन्हा क्रूझवर; आणखी आठ जण ताब्यात!

मुंबईच्या किनाऱ्याजवळ कॉर्डेलिया क्रूझवर रेव्ह पार्टी सुरु असताना शनिवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) अधिकाऱ्यांनी छापा मारला. तेव्हा कारवाईदरम्यान एनसीबीने ड्रग्स जप्त केले असून आठ जणांना ताब्यात घेतले होते. बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सुद्धा क्रूझवर होता. त्याला रविवारीच एनसीबीने अटक केली आहे.

कॉर्डेलिया क्रूझवर सोमवारी (४ ऑक्टोबर) पुन्हा एकदा एनसीबीच्या पथकाने तपासणी केली असता यावेळी आणखी आठ जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींनी काही अमलीपदार्थ (ड्रग्स) हे त्यांच्या सामनात लपवून ठेवल्याचा संशय एनसीबीला आहे. त्यामुळे एनसीबीचे पथक पुन्हा एकदा सर्च ऑपरेशनसाठी कॉर्डेलिया क्रूझवर दाखल झाले होते, अशी माहिती एनसीबीच्या सूत्रांमार्फत समजली. आज आर्यन खानला पुन्हा कोर्टात हजर करण्यात येणार आहे. काल एक दिवसासाठी आर्यनची कस्टडी एनसीबीला मिळाली होती.

हे ही वाचा:

काय आहे नार्कोटिक जिहाद?

रत्नागिरीतील ‘या’ झाडाची किंमत आहे तब्बल १०० कोटी!

बोरिवली स्थानक परिसरात ‘दंगा करतोय रिक्षावाला!’

… आणि काबूल पुन्हा हादरले; मशिदीबाहेर बॉम्बस्फोट!

एनसीबीला क्रूजवर ड्रग्सबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर एनसीबीचे काही अधिकारी प्रवासी बनून तिथे गेले होते. त्यानंतर क्रूझ समुद्रात गेल्यानंतर जेव्हा पार्टी सुरु झाली, तेव्हा एनसीबीने कारवाई केली. कॉर्डेलिया क्रूझने आपले जहाज एका खासगी कार्यक्रमासाठी दिल्लीतील इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला भाड्याने दिल्याची माहिती समोर आली होती. आपल्याला व्हीआयपी गेस्ट म्हणून बोलावण्यात आलं होते, असे शाहरूख खान चा मुलगा आर्यन खान याने चौकशीदरम्यान सांगितल्याचे एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांनी सांगितले.

Exit mobile version