१२५ कोटीच्या अमली पदार्थांसह ९ जणांना अटक

मुंबईसह राज्यात एनसीबीची कारवाई,

१२५ कोटीच्या अमली पदार्थांसह ९ जणांना अटक

मुंबईसह राज्यभरात पसरलेले आंतरराष्ट्रीय ‘ड्रग्स ट्रॅफिकिंग’ (अमली पदार्थ तस्करी) रॅकेट नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (एनसीबी) उध्वस्त करण्यात आले आहे.एनसीबीने मुंबई, पुणे आणि नवीमुंबईतून ३ परदेशी नागरिकांसह ९ जणांना अटक करून सुमारे १२५ कोटी रुपयांचा अमली पदार्थ जप्त केला आहे.जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थामध्ये ७किलो ‘कोकेन’ आणि २०० किलो ‘अल्प्राझोलम’ या नशेच्या गोळ्या तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल जप्त करण्यात आला आहे.

 

ही कारवाई एनसीबीच्या मुंबई विभागाने मागील काही दिवसात केली असून अटक करण्यात आलेल्यापैकी परदेशी नागरिक हे आंतरराष्ट्रीय ‘ड्रग्स ट्रॅफिकिंग’ रॅकेटचा भाग असल्याची माहिती एनसीबीच्या अधिकारी यांनी दिली आहे.
नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) मुंबई विभागाकडून आंतरराष्ट्रीय ड्रग ट्रॅफिकिंग सिंडिकेटवर (अमली पदार्थ आंतरराष्ट्रीय तस्करी टोळी) विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले होते. या आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्करांची माहिती काढण्यासाठी एनसीबीच्या अधिकारी यांनी आपल्या खबऱ्याच्या मदतीने या टोळीची माहिती आणि टोळीच्या नेटवर्क बाबतची माहिती मिळवण्यास सुरुवात केली होती.

 

या टोळीतील सदस्य मुंबईतून गोवा, बेंगळुरू,दिल्ली आणि हैद्राबाद या सारख्या इतर शहरांममधील ड्रग्स तस्करांचे नेटवर्कवर लक्ष ठेवण्यात येत असताना नवीमुंबईतील खारघर परिसरात या आंतरराष्ट्रीय टोळीचा एक मुख्य सदस्यांची माहिती एनसीबीच्या हाती लागली.

 

कोकेन हे महागडे अमली पदार्थाची एक मोठी डिलिव्हरी नुकतीच खारघर येथे राहणाऱ्या नायजेरियन नागरिक पॉल इकेना उर्फ बॉसमन नावाच्या व्यक्तीला मिळाल्याची माहिती एनसीबीच्या हाती लागली होती, तसेच पॉल इकेना उर्फ बॉसमन दीर्घकाळापासून अंमली पदार्थांच्या तस्करीत गुंतल्याचे उघड झाले.

 

त्यानुसार, पॉलवर योग्य पाळत ठेवून त्याला अटक करण्यात आली,दरम्यान एनसीबीने त्याच्याकडून जवळपास दोन किलो कोकेन जप्त करण्यात आला. चौकशी दरम्यान गुजरात मधील सुरत येथील दोन व्यक्ती पॉल इकेना यांच्याकडून विक्रीसाठी अमली पदार्थ खरेदी करीत असल्याचे तपासात समोर आले. या माहितीच्या आधारे एनसीबीने साकीर आणि सुफियान नावाच्या दोघांना अटक करण्यात आली.तपासा दरम्यान, मीरा रोड येथील एका घरमालकाला पॉलच्या बेकायदेशीर आश्रयस्थानासाठी अटक करण्यात आली आहे .अमली पदार्थांच्या पैशाची लाँड्रिंग करण्यासाठी एका बँक व्यवस्थापकाला देखील अटक करण्यात आली आहे.पॉल इकेन्ना उर्फ बॉसमन सन १९८८ काळापासून अंमली पदार्थांच्या व्यवसायात असून त्याला १९८९मध्ये एनसीबीच्या ४ किलो हेरॉईनसह अटक करण्यात आली होती.

 

त्यानंतर त्याला २००१ मध्ये ११ किलो हेरॉईन प्रकरणात अटक करण्यात आली होती (या प्रकरणात तो दोषी ठरला होता).
एनसीबीने दुसऱ्या कारवाईत एव्हलिना अल्वारेझ नावाची महिलेला १२ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली, ही महिला एतिहाद एअरलाइन्सद्वारे दुबई मार्गे साओ पाओलो येथून मुंबईला आली होती, एव्हलिना हिने राहण्यासाठी बुक केलेल्या मुंबईतील एका हॉटेलच्या खोलीतून बोलिव्हियन नागरिक ग्लोरिया इलोर्का सी नावाच्या आणखी एका महिलेला अटक करण्यात आले, त्यांच्या सामानाची झडती घेतली असता, इव्हलिनाच्या सामानातून २किलो १८० ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले, तर ग्लोरियाच्या सामानातू २ किलो ८२० ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले.

हे ही वाचा:

गाझात आकाशातून पत्रके पडली, ११ लाख पॅलेस्टिनींना विस्थापित होण्याच्या सूचना

डोंबिवलीतील शाळेच्या शिक्षिकेकडून ५० ते ६० विद्यार्थ्यांना बेदम मारहाण!

पुढच्या निवडणुकांआधीच निर्णय घेण्याचे विधानसभा अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

भारत- पाक सामना बघायला जाणाऱ्यांसाठी पश्चिम रेल्वेकडून विशेष ट्रेन

या दोघीनी अंडरगारमेंट्स, कपडे, टूथपेस्ट, कॉस्मेटिक ट्यूब, साबण, पादत्राणे, मेकअप किट यांसारख्या वस्तूंमध्ये ड्रग्ज लपून ठेवले होते. एनसीबीने ६ ऑक्टोबर रोजी पुण्यातील शिरूर आणि आंबेगाव तालुक्यात तिसरी कारवाई अल्प्राझोलम या नशेच्या गोळ्या तयार करणाऱ्या कारखाना आणि प्रयोगशाळा या ठिकाणी छापे टाकून जवळपास २०० किलो चा नशेच्या गोळ्या तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल आणि अल्प्राझोलम गोळ्या जप्त केल्या आहे. या प्रकरणी ६ जणांना अटक करन्याय आली आहे.

 

पुणे जिल्ह्यातील मिडगुळवाडी, ता. शिरूर या ठिकाणी कारखान्याच्या शेडमध्ये पद्धतशीर आणि अत्याधुनिक गुप्त प्रयोगशाळा तयार करण्यात आली होती, या प्रयोगशाळेच्या तपासणीत १७३.३५ किलो अल्प्राझोलम उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाचा प्रचंड साठा सापडला. या प्रयोगशाळेत अत्याधुनिक उपकरणे, अणुभट्ट्या, जनरेटर, ड्रायर्स इत्यादींचा समावेश होता. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या व्यक्तीच्या चौकशीत नारायणगाव, ता-आंबेगाव, जिल्हा-पुणे जवळ आणखी एक कारखाना शेड उघडकीस आला. शेडची बारकाईने पडताळणी केली असता ती देखील एक गुप्त प्रयोगशाळा असल्याचे आढळून आले. या प्रयोगशाळेत, अल्प्राझोलम उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या प्रचंड साठ्यासह २५.९५ किलो अल्प्राझोलम सापडले. या प्रयोगशाळा ज्या ठिकाणी उभ्या करण्यात आल्या होत्या तो पूर्णपणे दुर्गम भाग असून त्या ठिकाणी कुठलीही वाहने पोहचू शकत नाही.

Exit mobile version