देशाला हादरवणाऱ्या छत्तीसगडमधील नक्षलवादी हल्ल्यात सीआरपीएफचे २२ जवान हुतात्मा झाले होते. सीआरपीएफच्या कोब्रा बटालियनमधील राकेश्वर सिंग या जवानाचा फोटो नक्षलवाद्यांनी शेअर केला आहे. जवानाचा फोटो शेअर करताना तो सुरक्षित असल्याचं ही सांगण्यात आलं आहे. नक्षलवाद्यांनी त्याच्या सुरक्षित सुटकेसाठी त्यांनी एक अट ठेवली होती.
छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांनी स्थानिक पत्रकारांना फोन करुन बेपत्ता जवान आपल्या ताब्यात असल्याचं सांगितलंय. तसेच त्याची सुटका व्हावी यासाठी एक अट समोर ठेवलीय. या अटीनुसार जवानाने सुटकेनंतर सुरक्षा दलात काम करु नये. ही नोकरी सोडून इतर कोणतंही काम करावं, अशी भूमिका नक्षलवाद्यांनी घेतलीय. नक्षलवाद्यांच्या या भूमिकेमागील कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.
हे ही वाचा:
शरद पवारांनी घेतला लसीचा दुसरा डोस
लेहमध्ये बदलापूरच्या जवानाला हौतात्म्य
ठाकरे सरकारने व्यापाऱ्यांना रस्त्यावर आणले
लॉकडाऊनवरून ठाकूर यांनी ठाकरेंना हाणले
दुसरीकडे जवान राकेश्वर सिंह यांच्या पत्नीने छत्तीसगड सरकारकडे आपल्या पतीची सुटका करण्याची विनंती केलीय. नक्षलवाद्यांची मागणी मान्य करा आणि पतीची सुटका करा, अशी भावना या जवानाच्या पत्नी मिनू मनहस यांनी व्यक्त केलीय.
जवान राकेश्वर सिंह यांचे वडील देखील सीआरपीएफमध्ये होते. ते देशासाठी लढताना एका मोहिमे दरम्यानच हुतात्मा झाले होते. राकेश्वर यांच्या कुटुंबात त्यांच्याशिवाय आई, पत्नी आणि एक लहान मुलगी आहे.