नक्षलविरोधी पोलीस पथकाला गडचिरोली जिल्ह्यात मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशनमध्ये तब्बल २६ नक्षलवाद्यांना ठार केले. पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या या चकमकीत नक्षलविरोधी पोलीस पथकाचे तीन जवान गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नागपुरात हलविण्यात आले आहे. पोलिसांची मागील तीन वर्षातील ही सर्वात मोठी कामगिरी आहे.
आज झालेल्या चकमकीत मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांची अद्याप नेमकी ओळख पटलेली नाही. पण यामध्ये नक्षलवाद्यांचा मोठा नेता असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. धानोरा तालुक्यातील मरदिनटोलाच्या जंगलात सकाळी ही चकमक सुरु होती. या परिसरात अजूनही पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती मिळत आहे. हा परिसर महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील घनदाट जंगलात असल्याने बाहेर संपर्क करणे कठीण होत आहे.
मोहिमेमध्ये नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये मोठी चकमक उडाली. नक्षलवाद्यांनी पोलिसांवर बेछूट गोळीबार केला. यात पोलिसांचे तीन जवान गंभीर जखमी झाले आहेत. जखमी पोलीस जवानांना हेलिकॉप्टरने नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी अजूनही पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन सुरू असून मोठ्या संख्येत पोलीस तुकड्या पाठविण्यात आल्या आहेत.
हे ही वाचा:
…तर पद्मशी परत करेन आणि जाहीर माफीही मागेन
आम्ही सहिष्णू आहोत म्हणून आमच्या सहनशक्तीचा अंत बघू नका
महाराष्ट्रात हिंदूंची दुकाने जाळली जात आहेत
सपा, बसपा, काँग्रेस एकत्र आले तरी भाजपाच जिंकणार
या चकमकीमध्ये एक मोठा नक्षलवादी नेता मारला गेल्याची चर्चा आहे. याबद्दल अद्याप पोलिसांनी काही माहिती देण्यास नकार दिला आहे.