नवाब मलिकांचा तुरुंगातील मुक्काम वाढला

न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ

नवाब मलिकांचा तुरुंगातील मुक्काम वाढला

मनी लॉड्रींग प्रकरणी अटकेत असलेले नवाब मलिक यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. आता २ नोव्हेंबरपर्यंत नवाब मलिक यांचा मुक्काम तुरुंगातच असणार आहे. नवाब मलिकांना सध्या कुर्ला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मनी लॉड्रींग प्रकरणी २३ फेब्रुवारीला मलिकांना ३ मार्च पर्यंत ईडीने कोठडी सुनावली होती. त्यानंतर तीन दिवस मलिक वैद्यकीय कारणास्तव रुग्णालयात होते. पुढे ईडीने मलिकांची रवानगी तुरंगात केली.

कुख्यात गुंड दाऊदशी संबंध आणि मनी लॉंड्रिंग प्रकरणात मलिकांना ईडीने अटक केले आहे. मालमत्ता खरेदी आणि गैरव्यवहार प्रकरणात मलिकांचा संबंध असल्याचा आरोप ईडीने केला आहे. कुर्ल्यातील एक जमीन कमी किंमतीत विकत घेतल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर पत्रकार परिषदेत केला होता. मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांकडून मलिक यांच्याशी संबंधित कंपनीने ही जागा विकत घेतल्याचे फडणवीस यांनी म्हटले होते. त्या संदर्भात पुरावेही दिले होते.

हे ही वाचा:

‘ठाकरे कुटुंबियांचे उत्पन्न आणि संपत्तीचा मेळ लागत नाही’

युक्रेनवरील रशियन हवाई हल्ल्यात चार ठार

पीएफआयला राम मंदिर पाडून बाबरी मस्जिद बांधायची होती

पूजा चव्हाणसाठी मी लढत असताना भास्करशेठ तुम्ही कुठल्या बिळात लपला होतात?

दरम्यान, ईडीने अटक केल्यानंतर नवाब मलिकांनी न्यायालयात धाव घेऊन ही अटक चुकीच्या पद्धतीने केल्याचे म्हटले होते, मात्र न्यायालयाने नवाब मलिक यांना दणका देत ईडीने केलेली अटक कायद्यानुसारच असल्याचे म्हणत त्यांची याचिका फेटाळून लावली होती. गेल्या सात महिन्यांपासून नवाब मलिक हे कोठडीत आहेत.

Exit mobile version