अमरावती जिल्ह्यातून लव्ह जिहादचे प्रकरण उघडकीस आले आहे. अमरावतीतील राजापेठ भागात एका हिंदू मुलीचे काल अपहरण करण्यात आले होते. मुलीने केलेल्या चॅटिंग वरून पोलिसांनी सोहेल शहा या संशयित आरोपीला राजापेठ पोलीस ठाण्यात हजर केले होते. मात्र, अजूनही त्या मुलीचा शोध न लागल्याने भारतीय जनता पक्ष विश्व हिंदू परिषद कार्यकर्ते व अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आक्रमक झाल्या आहेत. याप्रकरणी नवनीत राणा यांनी पोलिसांना नडल्या आहेत.
अमरावतीतील धारणी येथील लव्ह जिहादचं प्रकरण समोर आलं आहे. अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील एका मुलीला पळवून नेण्यात आले. जबरदस्तीने त्या मुलीचे लग्न लावण्यात आले आणि त्या मुलीला डांबून ठेवण्यात आला असल्याचा आरोप नवनीत राणा आणि त्या मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे. यावेळी या प्रकरणाच्या चौकशीसाठी नवनीत राणा यांनी पोलिसांना कॉल केला असता त्यांनी राणा यांचा कॉल रेकॉर्ड केला यावरून नवनीत राणा व पोलिसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद झाला. एका लोक प्रतिनिधीचा कॉल रेकॉर्ड करण्याचा तुम्हाला अधिकार कोणी दिला, असा सवाल राणा यांनी केला आहे.
पोलीस या प्रकरणी सहकार्य करत नसल्याचा राणा यांनी आरोप केला आहे. पोलीस तपासादरम्यान काहीही सांगत नाही. मुलीला समोर आणा अशी मागणी राणा करत आहेत. दोन तासांत मुलीला हजर करा, असे अल्टिमेटम राणांनी पोलिसांना दिले आहे.
हे ही वाचा:
‘कर्तव्यपथ’वर झाले शिक्कामोर्तब
Asia Cup 2022: श्रीलंकेकडून पराभव आता भारतासाठी ‘आशा’ कप
वर्षा उसगावकर असे काय बोलल्या की त्यांना मागावी लागली माफी
मॉस्कोत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा
दोन दिवसांपूर्वीच लव्ह जिहाद मुद्द्यावरून नवनीत राणा यांनी कठोर पावले उचलणार असल्याचे सांगितले होते. अमरावती जिल्ह्यातील ज्या मुली लव्ह जिहादच्या कचाट्यात सापडल्या आहेत. त्या मुलींशी संपर्क करून त्यांना आणि कुटुंबीयांना मदत करण्याचं काम सुरु केल्याचे राणा यांनी सांगितले होते. येणाऱ्या काळात लव्ह जिहादच्या विरोधात आम्ही मोठी मोहीम उभारणार असंही त्यावेळी नवनीत राणा यांनी सांगितले होते.