शुक्रवार २ एप्रिल रोजी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत एक अनोखा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. या कार्यक्रमा अंतर्गत नवी मुंबई पोलीसांनी कारवाई करत जप्त केलेला चोरिचा मुद्देमाल हा नागरिकांना परत करण्यात आला.
गेली वर्षभर सारे जग कोरोना विषाणू नावाच्या एका शत्रूचा सामना करत आहे. भारतही त्याला अपवाद नाही. या लढाईत महत्वाची भूमिका बजावली ती पोलीस दलाने. एकीकडे कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या निर्बंधांची अंमलबजावणी करणे, तर दुसरीकडे होणाऱ्या गुन्ह्यांचा तपास करणे अशी दुहेरी जबाबदारी पोलीस पार पाडत होते.
हे ही वाचा:
…आणि महाराष्ट्र काँग्रेस पडली तोंडावर
आव्हाड साहेब…उद्धव ठाकरेंना तुमच्याकडेच ठेवा
मुंबईत लॉकडाऊन लावावाच लागेल-अस्लम शेख
महाराष्ट्रात कोरोना रुग्णवाढीचा विस्फोट
नवी मुंबईतील ८० टक्के पोलीस दल हे कोविडची ड्युटी बजावत होते. पण अशा परिस्थितीतही पोलीसांनी आपल्या मुळ कर्तव्याला बगल दिली नाही. कोविडच्या काळात घडलेल्या अनेक गुन्ह्यांचा तपास यशस्वीपणे पूर्ण केला आहे. यात चोरी, घरफोडी, चेन स्नॅचिंग, गाडी चोरी अशा अनेक गुन्ह्यांचा समावेश आहे. या तपासातून चोरांच्या मुस्क्या आशळत पोलीसांनी तब्बल ३ कोटी ७५ लाख इतक्या किंमतीचे सोन्या चांदिचे दागिने आणि इतर मुद्देमाल ताब्यात घेतला.
गुरूवारी २ एप्रिल रोजी पोलीस आयुक्तालयातर्फे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून हा ताब्यात घेतलेला मुद्देमाल त्यांच्या खऱ्या मालकांना परत करण्यात आला. यासाठीची आवश्यक ती सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करतण्यात आली आणि फिर्यादींना हा मुद्देमाल परत करण्यात आला. कोविडची परिस्थिती लक्षात घेता जास्त गर्दी जमू नये म्हणून ३१ फिर्यादींना बोलवून अंदाजे ३५ लाख रूपयांचा मुद्देमाल त्यांना परत करण्यात आला. येणाऱ्या काळात टप्प्या टप्प्याने सर्व फिर्यादिंना मुद्देमाल परत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह, पोलीस उप आयुक्त सुरेश मेंगडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक वत्स आणि भरत गाडे हे उपस्थित होते. तसेच नवी मुंबईतीर सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि मुद्देमाल कारकून उपस्थित होते.