पहलगाम हल्ल्याबद्दल नौशादने केले पाकिस्तान, दहशतवाद्यांचे अभिनंदन, मुसक्या आवळल्या

झारखंड पोलिसांची कारवाई

पहलगाम हल्ल्याबद्दल नौशादने केले पाकिस्तान, दहशतवाद्यांचे अभिनंदन, मुसक्या आवळल्या

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत असताना झारखंडमध्ये एका तरुणाने या घटनेवर आनंद व्यक्त केला आहे. यानंतर पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे. पहलगाम हल्ल्यावर आनंद व्यक्त करत सोशल मीडियावर दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा आणि पाकिस्तानचे अभिनंदन या तरुणाने केले होते. मोहम्मद नौशाद असे याचे नाव असून त्याला झारखंडमध्ये अटक करण्यात आली आहे.

आरोपी मोहम्मद नौशाद हा ३५ वर्षीय तरुण बोकारोमधील मखदुमपूर येथे राहायला आहे. बिहारमधील एका मदरशातून कुराण शिकून त्याने पदवी मिळवली. सध्या तो त्याच्या वडिलांसोबत राहतो. त्याचा एक भाऊ दुबईत असून त्याच्या नावावर असलेल्या सिम कार्डचा वापर करून, नौशाद इंस्टाग्राम, एक्स आणि फेसबुक चालवतो. बुधवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या जीवितहानीबद्दल संपूर्ण देश शोक करत असताना नौशाद मात्र दहशतवाद्यांना अभिनंदन करण्याच्या पोस्ट करण्यात व्यस्त होता.

नौशादने एक्सवर उर्दूमध्ये लिहिले होते की, “धन्यवाद पाकिस्तान, धन्यवाद लष्कर-ए-तोयबा अल्लाह तुम्हाला कायम आनंदी ठेवो. आमेन, आमेन. जर आरएसएस, भाजप, बजरंग दल आणि माध्यमांना लक्ष्य केले गेले तर आपल्याला अधिक आनंद होईल.” यासोबतच त्याने तीन स्मायली इमोजी वापरून आपला आनंद व्यक्त केला. यानंतरही त्याने अनेक ट्विट केले ज्यात त्याने खूप आक्षेपार्ह आणि चिथावणीखोर गोष्टी लिहिल्या.

हे ही वाचा..

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात लग्नाच्या वाढदिवशीचं रायपूरमधील व्यावसायिकाने गमावला जीव

पहलगाम हल्लामुळे भीषण आठवणी ताज्या झाल्या

माजी ऑस्ट्रेलियन टेस्ट ओपनर कीथ स्टॅकपोल यांचे निधन

पाकिस्तानने हात केले वर! म्हणाले, आम्ही नाही त्यातले !!

नौशादच्या या पोस्टची दखल लोकांनी घेत याची माहिती झारखंड पोलिसांना देण्यात आली. शिवाय त्याला अटक करून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. प्रकरणाचे गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन, एसपी मनोज स्वर्गियारी यांनी निरीक्षक नवीन कुमार सिंह यांच्या नेतृत्वाखाली तांत्रिक कक्षाच्या मदतीने एसआयटी स्थापन केली. रात्रभर तपास केल्यानंतर एसआयटीने बुधवारी सकाळी नौशादच्या मुसक्या आवळल्या. सध्या त्याची पोलिस ठाण्यात चौकशी सुरू आहे. त्याच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर केले जाईल.

पाक लष्करप्रमुख मुनीर जे बोलले तेच पहलगाममध्ये घडले ! | Mahesh Vichare | Pahalgam | Asim Munir |

Exit mobile version