दिल्ली सरकारच्या मद्य धोरणातील भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआयनंतर ईडीने आज, ६ सप्टेंबरला तपास करण्यास सुरुवात केली आहे. ईडीने दिल्ली एनसीआरसह देशभरात अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. मुंबईसह, दिल्ली, लखनऊ, गुरुग्राम, चंदीगड, हैद्राबाद,बेंगळुरूमध्ये यासह इतर अनेक राज्यांमध्ये तीसहून अधिक ठिकाणी छापे टाकत आहे.
दिल्ली सरकराने जाहीर केलेल्या अबकारी धोरणावर भाजपाकडून टीका होत होती. त्यानंतर ईडीने छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी या प्रकरणाचा तपास सीबीआय करत होती. सीबीआयने या पूर्वी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर छापे टाकले होते. सीबीआईने सिसोदिया यांचे लॉकरही या प्रकरणी तपासले आहेत. या प्रकरणी बारापेक्षा अधिक जणांवर तसेच कंपन्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र हा तपास आता ईडीने सुरु केला असून, देशभरातील दारू व्यवसायिकांच्या घरावर ईडीने छापे टाकले आहेत.
Delhi Excise Policy case | Enforcement Directorate (ED) raids underway in Delhi and multiple cities in Uttar Pradesh, Punjab Haryana, Telangana & Maharashtra.
Visuals from the residence of businessman Sameer Mahandru in Jor Bagh, Delhi. pic.twitter.com/Ysr6gBKvsA
— ANI (@ANI) September 6, 2022
सीबीआयने दाखल केलेली एफआयआर ईडीने ताब्यात घेतले आहे. दिल्लीच्या जोरबाग येथील दारू व्यावसायिक आणि या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी समीर महेंद्रू यांच्या घरी ईडीचे पथक पोहचले आहे. समीर यांच्या घरातील एका सदस्याला घेऊन ईडीचे पथक हे दुसऱ्या ठिकाणी छापेमारी करण्यास पोहचले आहेत. समीर यांच्या खात्यावर एक कोटी रुपये हस्तांतरण करण्यात आले आहेत. यामुळे सीबीआयच्या एफआयआरमध्ये समीर यांचे नाव दाखल करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
अर्शदीप सिंगचा संबंध खालिस्तानशी जोडल्यामुळे विकिपीडियाला नोटीस
१४ हजार ५०० शाळांसाठी ‘पीएम श्री स्कुल्स’ स्मार्ट योजनेची घोषणा
दोन दशकानंतर पाकिस्तानने दहशतवाद्याचा मृतदेह स्वीकारला
आज ईडीने देशभरात छापेमारी केली पण त्यापूर्वीच भाजपाने एका दारू व्यावसायिकाच्या वडिलांचे स्टिंग ऑपरेशनचा एक व्हिडीओ समोर आणला होता. हा व्हिडीओ बाहेर काढल्यानंतर भाजपाने दावा केला की, या व्यावसायिकाच्या वडिलांनी कबुली दिली की ‘आप’ सरकार नव्या मद्य धोरणांतर्गत कमीशन घेत होते. तसेक व्यवसायिकाची लूट करत आहे. त्यानंतर ईडीने याप्रकरणी देशभरात छापेमारी करण्यास सुरुवात केली आहे.