समीर वानखेडेंनी केलेल्या तक्रारीची राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडून दखल

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात प्रकाशझोतात आलेले एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार केली होती.

समीर वानखेडेंनी केलेल्या तक्रारीची राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडून दखल

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात प्रकाशझोतात आलेले एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने घेतली आहे. एनसीबी उपमहासंचालक यांच्याविरोधात फेब्रुवारी २०२२ मध्ये समीर वानखेडे यांनी ही तक्रार केली होती.

समीर वानखेडे यांनी एनसीबीचे डेप्युडी डायरेक्टर जनरल ज्ञानेश्वर सिंह यांच्या विरोधात छळवणुकीची तक्रार केली होती. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाला १७ ऑक्टोबर रोजी समीर वानखेडे यांची तक्रार मिळाली असून आयोगाने या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. याचिकाकर्त्यांशी भेदभाव आणि छळ होत असल्याचे आयोगाचे निरीक्षण आहे, त्यामुळे प्रकरण प्रलंबित असेपर्यंत पुढील कारवाई करू नये, अशी सूचना आयोगाने दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आली आहे.

एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी आपला छळ केल्याची तक्रार वानखेडे यांनी केली आहे. शिवाय ज्ञानेश्वर सिंह यांच्याकडून कुटुंबाला त्रास होत असल्याचा आरोपही समीर वानखेडेंनी केला. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात ज्ञानेश्वर सिंह यांनी समीर वानखेडे आणि इतर काही अधिकाऱ्यांची चौकशी केली होती. या प्रकरणात समीर वानखेडेंनी केलेल्या तपासावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. आर्यन खानला क्लीन चिट मिळाल्यानंतर या प्रकरणाचा तपास एनसीबीच्या व्हिजिलन्स कमिटीने केला.

हे ही वाचा:

रितेश, जीनिलीयाच्या कंपनीवर मेहेर नजर का?

‘ठाकरे कुटुंबियांचे उत्पन्न आणि संपत्तीचा मेळ लागत नाही’

युक्रेनवरील रशियन हवाई हल्ल्यात चार ठार

पीएफआयला राम मंदिर पाडून बाबरी मस्जिद बांधायची होती

आता राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने आता या संदर्भात १५ दिवसात अहवाल दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या मुदतीत आयोगाला उत्तर न मिळाल्यास आयोग भारतीय राज्यघटनेच्या कलम ३३८ अन्वये दिलेल्या दिवाणी न्यायालयांच्या अधिकारांचा वापर करू शकेल, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Exit mobile version