29 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरक्राईमनामालव्ह जिहादमुळे राष्ट्रीय बेसबॉलपटूची आत्महत्या, हिंदू असल्याचे दाखवत मुलाने फसवले

लव्ह जिहादमुळे राष्ट्रीय बेसबॉलपटूची आत्महत्या, हिंदू असल्याचे दाखवत मुलाने फसवले

पोलिसांनी केली आरोपीला अटक, सोशल मीडियावर मुलीचा व्हीडिओ केला होता शेअर

Google News Follow

Related

देशभरात लव्ह जिहादची अनेक प्रकरणे समोर येत असताना मध्य प्रदेशातही एका बेसबॉलपटूला लव्ह जिहादच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. या मुलीने या प्रकरणात आत्महत्याही केलेली आहे.

संजना बारखडे असे या मुलीचे नाव असून ती राष्ट्रीय स्तरावरील बेसबॉलपटू होती. मध्य प्रदेशातील जबलपूर येथे ती राहात होती. तिथे तिने आत्महत्या केली आहे. पोलिसांनी यासंदर्भात अब्दुल मन्सूरी याला अटक केली आहे. त्याने संजनाचा एक व्हीडिओ इंस्टाग्रामवर टाकला आणि त्यामुळे त्या मुलीने त्याच्याशी बोलणे बंद केले. तो व्हीडिओ डीलिट करण्यास ती सांगत होती, पण त्याने तो डीलिट केला नाही, परिणामी तिने हे टोकाचे पाऊल उचलले. मुख्य म्हणजे या अब्दुलने हिंदू असल्याचे संजनाला सांगितले होते आणि तो तिला धर्म परिवर्तन करण्याची सक्तीही करत होता, अशीही माहिती समोर आली आहे.

संजनाने ५ जून रोजी आत्महत्या केली होती. तिचे पालक हराई गावाला गेलेले असताना तिने हे पाऊल उचलले. संजना आणि अब्दुल हे सोशल मीडियावर एकमेकांच्या संपर्कात आले. गेले वर्षभर ते एकमेकांना ओळखत होते. अब्दुल हा जबलपूरला येऊन तिला भेटूनही गेलेला होता. संजनाच्या कुटुंबियांनी सांगितले की, अब्दुलने आपण राजन असल्याचे सांगितले होते. हिंदू नाव बदलून त्याने तिला जाळ्यात अडकवले. त्यानंतर तिने धर्मांतरण करावे म्हणून तिच्यावर दबाव आणला जात होता.

पोलिसांनी सांगितले की, जेव्हा आम्ही संजनाच्या कुटुंबियांची चौकशी केली तेव्हा अब्दुलने तिचा एक फोटो इंस्टाग्रामवर टाकल्याचे समोर आले होते. अब्दुलने तिला ब्लॅकमेल करण्यास आणि तिला धर्मांतरित करण्यासाठी प्रवृत्त केले होते. शिवाय, त्याने तिच्यासंदर्भात जो व्हीडिओ टाकला तोही डीलिट केला नाही. त्यामुळे तिने हे पाऊल उचलले.

हे ही वाचा:

धमक्या देण्याचा अधिकार फक्त मविआच्या नेत्यांना

इजिप्तमध्ये पर्यटकाला शार्कने नेले पाण्यात ओढून; व्हायरल व्हीडिओमुळे थरकाप

भाई जगतापांची गच्छंती, वर्षा गायकवाड मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष

‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर आशिया कप, वर्ल्ड कप मोफत पाहता येणार

संजना बारखडेच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले की, अब्दुलने आपल्या मुलीला मानसिक त्रास दिला. आम्ही घरी नसताना त्याने तिला एवढे धमकावले की, तिने हे पाऊल उचलले. त्याने तिला धर्मांतरण करण्याची सक्तीही केली. जर तिने इस्लाम स्वीकारला नाही तर तिला मारण्याचीही धमकी त्याने दिली. आम्हाला मुलीसाठी न्याय हवा आहे.

संजना ही राजस्थान, गुजरात, उज्जैन आणि देवास येथे झालेल्या बेसबॉलच्या स्पर्धांमध्ये खेळली होती. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी यासंदर्भात सखोल चौकशीचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा