लग्नाच्या मंगल कार्यालयात सुरू होते हे ‘अमंगल’ कार्य!

लग्नाच्या मंगल कार्यालयात सुरू होते हे ‘अमंगल’ कार्य!

नाशिकच्या एका मंगल कार्यालयात अमंगल कार्य सुरू असल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. नाशिकच्या निफाड तालुक्यातील चांदोरी गावामध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या पथकाने या मंगल कार्यालयात धाड टाकून देशी बनावट दारूच्या कारखान्यावर कारवाई केली. पोलिसांनी या कारवाई दरम्यान सुमारे एक कोटी रुपयांची बनावट दारू जप्त केली असून या प्रकरणी १३ जणांना अटक केली आहे.

नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक सचिन पाटील आणि त्यांच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई करत हा कारखाना उद्धवस्त केला. टॅंगो, प्रिन्स-संत्रा, रॉकेट आणि गोवा या तीन देशी बनावटीच्या दारूची बनावट पॅकिंग करून ही दारू जिल्ह्यासह राज्याबाहेर विक्रीसाठी तयार केली जात होती. परिसरातील लोकांना संशय येऊ नये म्हणून मंगल कार्यालयात रात्रीच्या वेळी हा बनावट दारू बनविण्याचा कारखाना सुरू होता. १५ ते २० लोकांच्या मदतीने पूर्णतः स्वयंचलित पद्धतीने या कारखान्यातून दररोज चार ते पाच ट्रक बनावट दारू बनवली जात होती.

हे ही वाचा:

जळगावात फुकटसेनेच्या ‘रणरागिणींचा’ भलताच प्रताप

‘स्वातंत्र्यसैनिकांच्या घरी जाऊन पेन्शन पोहोचवा!’

‘बेस्ट’ला महाराष्ट्र बंदचा बसला दोन कोटींचा फटका!

‘बंदमुळे भाज्या, फळे नासली; ३०० ट्रक माल पडून राहिला’

या कारखान्यावर छापा टाकून एक कोटींची बनावट दारू व साहित्य जप्त करण्यात आले असून तेरा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी सायखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version