26 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरक्राईमनामाआणि पेटलेले सिलेंडर रॉकेटसारखे हवेत झेपावले

आणि पेटलेले सिलेंडर रॉकेटसारखे हवेत झेपावले

हायड्रोजन सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकला आग लागण्याची घटना

Google News Follow

Related

नाशिकमधील अपघाताचे सत्र काही थांबायला तयार नाही. चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या बसला लागलेल्या आगीत १२ जण होरपळून ठार होत काही तास उलटत नाही तोच मालेगाव- मनमाड रस्त्यावर एक विचित्र अपघात झाला आहे. हायड्रोजन सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकला आग लागण्याची घटना घडली आहे. ट्र्कचे पुढचे टायर फुटल्याने हा अपघात झाला. या आगीनंतर ट्रकमध्ये ठेवण्यात आलेल्या हायड्रोजन सिलेंडरचा एकामागून एक स्फोट व्हायला लागले. इतकेच नाही तर एखाद्या रॉकेट प्रमाणे हे सिलेंडर आग लागलेल्या अवस्थेत तब्बल २० ते २५ फूट उंच उडू लागले. या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही.

चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या बसला झालेल्या अपघाताची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकमध्ये आले होते . ते नाशिकमधून बाहेर पडत नाही तोच हा अपघात झाला. हायड्रोजन घेऊन जाणारा हा ट्रक सुरतवरून औरंगाबादकडे जात होता. त्यावेळी कानडगाव शिवारामध्ये या ट्रकला आग लागली. आग लागण्याची घटना कळताच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. परंतु त्याचवेळी या ट्रकमधील हायड्रोजन सिलेंडर स्फोट होऊन हवेत उडू लागले. आग विझवण्यास सुरुवात करतानाच हे स्फोट होऊ लागले. या घटनेनंतर या भागात चार किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती.

हे ही वाचा:

या प्रकरणी सीबीआयकडून लालू यादवांसह १५ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

भुजबळांप्रमाणे चतुर्वेदी सीए याने ‘मातोश्री’ची कागदपत्रे व्हाईट करून घेतली

सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन

मुंबईतल्या गोडाऊनमधून १०० कोटींचे एमडी जप्त

दरम्यान, नाशिकमध्येच सकाळी चिंतामणी ट्रॅव्हल्सला अपघात झाल्यानंतर दूपारी सप्तशृंगी गडाकडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला आग लागण्याची घटना घडली. ही बस नांदुरीहून वणी गडाकडे जात असताना ही अग लागली. प्रवाशांनी घाबरून बसमधून खाली उड्या मारल्या. परंतु सुदैवाने अपघातात कोणीही जखमी झाले नाही. दिवसभरात तीन आगीच्या दुर्घटना नाशिकमध्ये झाल्याचे दिसून आले आहे.

जोधपूरमध्येही सिलेंडर स्फोट

राजस्थानच्या जोधपूरमध्ये माता का ठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मगरा पुंजाला परिसरात अवैध गॅस रिफिलिंगचे काम करणाऱ्या एका व्यक्तीच्या घरात गॅस सिलिंडरने अचानक पेट घेतला. यानंतर गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. स्फोटानंतर एकामागून एक सुमारे चार ते सहा सिलिंडर फुटले. या अपघातादरम्यान एकाच कुटुंबातील २० लोक घरात होते, त्यापैकी ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १६ जण जखमी झाले. हे स्फोट इतके जोरदार होते की ज्या घरात हे स्फोट झाले, त्या घराच्या आजूबाजूच्या घरांना हादरे बसले. जणू भूकंप झाला. या घटनेनंतर परिसरात घबराट पसरली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा