देशभरात नवरात्रीचा उत्साह जोरदार सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.मात्र, दुसरीकडे गालबोटही लागण्याचे प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.नुकतंच काही दिवसांपूर्वी गुजरात राज्यात गरबा खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने दहा जणांचा मृत्यू झाला होता.तसाच काहीसा प्रकार महाराष्ट्रामध्ये देखील पाहायला मिळाला.गरबा खेळत असताना चक्कर येऊन खाली कोसळून एका तरुणाचा जीव गेला आहे.नाशिकच्या सिडकोमधील घटना.
नवरात्रीमध्ये तरुणाईचा उत्साह एकीकडे ओसांडून वाहत असताना दुसरीकडे मात्र या हृदयविकारामुळे मृत्यूच्या घटना घडत आहेत. गुजरातमध्ये गरबा खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने १० जणांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. एकाच दिवशी १० जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. त्यानंतर नाशिक शहरात नवरात्राेत्सवानिमित्त आयाेजित दांडिया-रास खेळताना सिडकाेतील तरुणाचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला. ही घटना गंगापूर पाेलिसांच्या हद्दीतील संत कबीरनगर परिसरात रविवारी घडली. ३६ वर्षीय रवींद्र अशोक खरे असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना हार्ट अटॅक?
नाशिकच्या गिरणा नदीत सापडलं कोट्यवधींचं ड्रग्ज
चॅटजीपीटीने लिहिलं काही क्षणात गाणं; बँडने केला लाईव्ह परफॉर्मन्स
भारताचे माजी फिरकीपटू बिशनसिंह बेदी यांचे निधन!
रवींद्र हा रात्री दांडिया खेळण्यासाठी संत कबीरनगर परिसरात आला हाेता. दांडिया खेळत असताना त्याला चक्कर आली व तो खाली पडला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. दोन दिवसांपूर्वी गुजरातमध्ये २४ तासांत गरबा इव्हेंटमध्ये हार्ट ॲटॅकने १० जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. अहमदाबाद, राजकोट आणि नवसारी येथेही अशीच प्रकरणे नोंदवली गेली आहेत. दरम्यान आजकाल हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले आहे. ज्या वयात त्याचा धोका वाढला आहे तो खूपच त्रासदायक आणि आश्चर्यकारक आहे.