१० जानेवारी २०१८ मध्ये जम्मूच्या कथुआ येथे एका अल्पवयीन मुलगी गायब झाली. तिचा मृतदेह मिळण्याआधीच एक नरेटिव्ह तयार होऊ लागले. त्या मुलीचे अपहरण झाले, तिच्यावर सामूहिक बलात्कार करून आरएसएसच्या विचारांच्या हिंदूनी तिला एका मंदिरात ठारही मारले असे कथानक रचण्यात आले.
पीडीपी हुरीयतचा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला तालिब हुसेन याने हे कारस्थान रचण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यात मग पटवारी सांजी राम याना या सगळ्या गुन्ह्याचा मास्टरमाइंड असल्याचे चित्र उभे केले गेले. भाजपाचे प्रवक्ते अमित मालवीय यांनी मधू किश्वर यांच्या याच विषयाला वाहिलेल्या पुस्तकाचा उल्लेख करून त्यामधील वास्तव पुस्तकातून जाणून घेण्याचे आवाहन केले आहे.
जम्मू काश्मीरच्या तत्कालीन मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी या घटनेचा फायदा उठवत जम्मू मधील अनेक हिंदू तरुणांना ताब्यात घ्यायला लावले.
मात्र असत्याचा बुरखा फाटणारच होता. मधु किश्वर यांनी हे काम प्रचंड मेहनत आणि संघर्ष करून केले. तीन वर्षे त्यांनी यावर खूप संशोधन केले, अनेक गोष्टी गोळा केल्या. अनेक मुलाखती व्हिडिओच्या रुपात घेतल्या, अनेक कायदेशीर बाबी तपासून पाहिल्या, कागदपत्रे अभ्यासली, आर्थिक व्यवहारांच्या मुळाशी त्या गेल्या आणि सोशल मीडिया वरील पोस्टचा आधार घेतला.
हे ही वाचा:
स्वर्वेद महामंदिर हे भारताच्या सामाजिक आणि आध्यात्मिक सामर्थ्याचे आधुनिक प्रतीक
लखनौच्या प्राणीसंग्रहालयातील पाणघोड्याचा क्लिनरवर हल्ला, क्लिनरचा जागीच मृत्यू!
‘चीनला शिकवलेला धडा जिनपिंग कधीही विसरणार नाहीत’
गोंधळ घातल्याप्रकरणी तब्बल ३३ विरोधी खासदारांचे निलंबन
मेहबुबा मुफ्ती सरकारने कशापध्दतीने सरकारी यंत्रणेचा निरंकुश वापर केला हे त्यांनी उघड केले. मुख्य प्रवाहातील माध्यमे, परदेशातील निधीवर पोसल्या गेलेल्या एनजीओ, आपल्या तालावर नाचणारे विचारवंत यांच्या मदतीने मुफ्ती सरकारने जम्मू मधील आपला लॅन्ड जिहादचा अजेंडा पुढे रेटण्यासाठी पोलीस आणि कायदेतज्ञांच्या मदतीने निरपराध हिंदूना अडकवले.
धक्कादायक बाब म्हणजे या मुलीच्या शवविच्छेदनाचा अहवालही तथाकथित पत्रकार आणि विचारवतांनी नाकारला.
पण मधू किश्वर यांनी ‘द गर्ल फ्रॉम कथुआ : अ सॅक्रीफिशियल व्हीकटीम ऑफ गझवा ए हिंद’ या पुस्तकातून या सगळ्या खोट्या, बनावट नरेटिव्हचा पर्दाफाश केला आहे. त्यामागील खरा मास्टरमाइंड समोर आणला आहे.