नारायण राणे यांचे ठाकरे सरकारवर टिकास्त्र; राष्ट्रपती राजवटीची केली मागणी

नारायण राणे यांचे ठाकरे सरकारवर टिकास्त्र; राष्ट्रपती राजवटीची केली मागणी

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह यांनी अतिशय गंभीर आणि धक्कादायक स्वरूपाचे आरोप केल्यानंतर भाजपा आक्रमक झाला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जोरदार टिका केली जात आहे. नारायण राणे यांनी देखील ट्वीटरवरून गृहमंत्र्यांना लक्ष्य केले आहे. एकामागोमाग एक तीन ट्वीट करत त्यांनी गृहमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

हे ही वाचा:

परमबीर सिंग यांच्या पत्राला अनिल देशमुखांचे पत्रकातून उत्तर

अमृता फडणवीसांचा ठाकरे सरकारवर काव्यात्मक निशाणा

नारायण राणे यांनी ‘सचिन वाझे यांना मर्डर केसमध्ये वाचवण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांनाही माहिती दिली होती. मग मुख्यमंत्र्यांनी ती माहिती मिळताच अनिल देशमुखांवर कारवाई का नाही केली? त्यांना मुख्यमंत्र्यांनी का निलंबित केलं नाही? (१/३)’ असा सवाल उपस्थित केला केला.

त्यानंतर दुसऱ्या ट्वीटमध्ये त्यांनी ‘मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली नाही, याचा अर्थ या १०० कोटी खंडणीच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचाही संबंध आहे. वाझेंना वाचवायचंही काम उद्धव ठाकरे करतात. मुख्यमंत्र्यांचा सर्व घटनांशी थेट संबंध आहे. त्यामुळे त्यांनी त्वरित राजीनामा देणं आवश्यक आहे. (२/३)’ असे म्हटले आहे.

सर्वात शेवटच्या ट्वीटमध्ये नारायण राणे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे. ‘महाराष्ट्रात भ्रष्टाचार वाढतोय. कायदा आणि सुव्यवस्था नाही. विकास ठप्प झालाय. पोलीसच गुन्हे करु लागले आहेत. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी मी केंद्रीय गृहमंत्री मा. अमित शाह यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. (३/३)’ असे त्यांनी म्हटले आहे.

Exit mobile version