अल्लू अर्जुनचा नुकताच आलेला ‘पुष्पा: द राइज’ (पुष्पा मूव्ही न्यूज) सर्वत्र चर्चेत आहे. त्याच्या गाण्यांवर पार्ट्यांमध्ये डान्स, रील्स बनवल्या जात आहेत. पण काही लोकांना यातून वेगळ्या पद्धतीने प्रेरणा मिळाली आहे. ‘पुष्पा’ चित्रपटापासून प्रेरित होऊन चंदनाची चोरी करणाऱ्या एकाला पकडण्यात नागपूर पोलिसांना यश आहे राज्यपाल व खाजगी बंगल्यात चंदनाच्या झाडांची चोरी करताना एकाला नागपूर पोलिसांनी पकडले आहे.चंदनाचे झाड कापण्याचे साहित्य आणि कापलेला चंदनाचा ओंडका पोलिसांनी जप्त केला आहे
नागपूर शहरामध्ये अलीकडच्या काळात चंदन चोरीच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली होती त्यामुळे नागपूर पोलिसांची झोप उडाली होती चंदन चोर मध्यरात्री ते पहाट या काळात ही चोरी करायचे विशेष म्हणजे या तस्करांनी राज्यपाल भावनातील बरीचशी चंदनाची झाडे तोडली होती त्यामुळे पोलिसांना या चंदन तस्करांचा असून शोध घेत होते.
चंदन तस्कर स्थानिक नसून बाहेरचे असावेत असा पोलिसांचा कयास आहे. यामध्ये राज्यपाल निवासस्थान, खासगी बंगले, सरकारी निवासस्थानांतील चंदनाची झाडे तोडली जात होती. बाजारात चंदनाला मोठी मागणी आहे. या चोरांचे वैशिष्ट्य म्हणजे किंमत मिळेल अशीच झाडे तो शोधून काढत असत.
हे ही वाचा:
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल दिसणार नव्या रुपात
नवरात्र २०२२ : परशुराम माता, रेणुकादेवीची कथा
कोकण विभागाकडून ११४ शेतकऱ्यांना पर्यटन प्रमाणपत्र
डीए वाढला; सरकारची केंद्रीय कर्मचाऱ्यांना भेट
हे चंदन तस्कर मध्यरात्रीच्या सुमारास सिविल लाईन मधील एका बंगल्यात चंदनाची चोरी करत होते पाळतीवर असलेल्या पोलिसांना याची कुणकुण लागताच धाड टाकून एका चंदन तस्कराला पकडण्यात आले, परंतु एक तस्कर मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला. नागपूरमध्ये चंदन चोरी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी काटोळ टोळीतील पाच चंदन चोरांना पकडण्यात आले होते. त्यावेळी चंदन चोरीचे कनेक्शन उत्तर प्रदेशपर्यंत असल्याचे उघड झाले होते. त्यामुळेच पोलिसांना या चोरीमध्ये बाहेरची लोक असल्याचा संशय आहे.