मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या हिंसाचारात म्यानमारस्थित दहशतवादीही सहभागी झालेले असू शकतात, अशी शंका राज्य सरकारला आहे. अर्थात, या दाव्याला दुजोरा देण्यासाठी सरकारकडे सध्या कोणतेही पुरावे नाहीत.
मणिपूरमध्ये गुरुवारी तलहटीच्या जवळ झालेल्या गोळीबारात पिता-पुत्रांसह चार जणांचा मृत्यू झाला. बुधवारीदेखील पोलिस कमांडोंवर हल्ला झाला होता, त्यात दोन कमांडोंचा मृत्यू झाला होता.
मणिपूरचे सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंह यांनी गुरुवारी याबाबत एक पत्रकार परिषद घेतली. या दरम्यान त्यांनी स्पष्ट केले की, कट्टरवाद्यांनी तीन वेगवेगळ्या परिसरात असलेल्या कमांडो चौक्यांवर गोळीबार केला. कमांडो खालील भागात तैनात होते. दहशतवाद्यांनी उंच ठिकाणांवरून गोळीबार केला. कमांडो आतापर्यंत शांत होते. ते सातत्याने लक्ष्य होत असल्याने आता कमांडोंना उंच ठिकाणी तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. मोरेहच्या पीडीएफसोबत म्यानमारचे काही सैनिक मिळून सुरक्षा दलावर हल्ला करू शकतात. आता राज्य सुरक्षा दलही सज्ज झाले आहे. मात्र आमच्याकडे याबाबतचा कोणताही पुरावा नाही, असे कुलदीप सिंह यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा:
प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यापूर्वी उत्तर प्रदेश एटीएसने तीन संशयितांना घेतलं ताब्यात
बलोच फुटीरतावाद्यांची पाकिस्तानविरोधात युद्धाची घोषणा!
‘एमपीएससी’मध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावत शेतकऱ्याच्या मुलाची बाजी
इराणची पाकिस्तानमध्ये घुसून कारवाई; दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त
गुरुवारी मारल्या गेलेल्या ग्रामस्थांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी इम्फाळच्या रिम्स रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. हत्येनंतर राज्याच्या दक्षिणेकडील भाग निंगथौखोंग बाजार आणि त्याच्या आसपासच्या परिसरात तणाव निर्माण झाला आहे. न्यायाच्या मागणीसाठी मोठ्या संख्येने लोकांनी विरोध दर्शवला, त्यामध्ये बहुतेक महिलांचा समावेश होता.