‘माझ्या मुलीची हत्या ‘लव्ह जिहाद’मुळे’

कर्नाटकातील काँग्रेस नगरसेवकाचा दावा

‘माझ्या मुलीची हत्या ‘लव्ह जिहाद’मुळे’

कर्नाटकमधील काँग्रेसचे नगरसेवक निरंजन हिरेमठ यांच्या मुलीची तिचा वर्गमित्र फयाज खोंडुनाईक याने चाकूने कॉलेजमध्येच हत्या केली. ही हत्या ‘लव्ह जिहाद’मुळे झाल्याचा दावा हिरेमठ यांनी केला आहे. नेहा हिरेमठ (२३) असे या मुलीचे नाव असून ती हुब्बळी येथील बीव्हीबी कॉलेजमध्ये मास्टर्सचे शिक्षण घेत होती. तिची गुरुवारी कॉलेजमध्येच हत्या करण्यात आली. तिने लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याने तिचा वर्गमित्र फयाझने सात-वेळा चाकूने भोसकून तिची हत्या केल्याचा दावा नेहाच्या वडिलांनी केला आहे.

‘हे लव्ह जिहाद नाही तर काय आहे? अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. मी अशा विविध घटना पाहात असून, त्यांची क्रूरता वाढत आहे. तरुण का भरकटत आहेत? गोष्टी अशा टप्प्यावर आल्या आहेत की मी हे सांगण्यास संकोच करू शकत नाही. कारण मुलगी गमावल्याचे दुःख मला माहीत आहे. मी आता वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये पाहिले आहे, पालक मुले गमावत आहेत. मला वाटते की हा ‘लव्ह जिहाद’ खूप पसरत आहे,’ असे हिरेमठ म्हणाले.

नेहाच्या हत्येवरून भाजप आणि सत्ताधारी काँग्रेसमध्ये शाब्दिक युद्ध सुरू असताना त्यांचे हे वक्तव्य आले आहे. भाजपने या प्रकरणाला ‘लव्ह जिहाद’ कारणीभूत असल्याचा आरोप करून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचा दावा केला. तर, काँग्रेस सरकारने या घटनेला कोणताही जातीय रंग असल्याचा इन्कार केला.

कर्नाटक काँग्रेसचे नेते जी परमेश्वरा यांनी दावा केला की, नेहा आणि फयाजचे प्रेमसंबंध आधीपासूनच होते. मात्र नंतर ते बिघडले. परंतु काँग्रेसचे नगरसेवक असणाऱ्या तरुणीच्या वडिलांनी पक्षाच्या विरोधात बाजू मांडली. तसेच, आरोपीच्या वतीने जामीन अर्ज दाखल करू नये आणि त्याला कोणत्याही प्रकारे मदत करू नये, अशी मागणीही त्यांनी केली. या गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षा देण्याची मागणीही त्यांनी केली.

“मी न्यायालय, बार असोसिएशन आणि पोलिसांकडे लव्ह जिहादच्या प्रकरणांमध्ये कठोर कारवाई करण्याची आणि गुन्हेगारांना शिक्षा देण्याची मागणी करतो. अशा प्रकरणांत चारपैकी एका व्यक्तीला आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. इतरांनाही लवकरात लवकर अटक करावी अशी माझी मागणी आहे… जर हा लव्ह जिहाद नसेल तर काय आहे? लव्ह जिहादसाठी ते चांगल्या घरातील मुलींना लक्ष्य करतात. त्यांना लवकरात लवकर अटक करून फाशी द्यावी,’ अशी मागणी हिरेमठ यांनी केली.

गुरुवारी मुलीची हत्या झाल्यानंतर हिरेमठ यांनी त्यांच्या मुलीवर एका वेगळ्या धर्माच्या अज्ञात व्यक्तीने मुलीवर वार केल्याचे सांगितले होते. ‘माझ्या मुलीचा वर्ग दुपारी साडेचार वाजता संपल्यानंतर ती कॉलेजमधून बाहेर आली आणि एका अज्ञात व्यक्तीने तिच्यावर चाकूने हल्ला केला. तिचा जागीच मृत्यू झाला,’ असे वृत्त पीटीआयने गुरुवारी निरंजन हिरेमठ यांच्या हवाल्याने दिले होते.

हे ही वाचा:

मोदीस्तुती करणारे गाणे गाणाऱ्या युट्युबरवर मुस्लिम तरुणांचा हल्ला

मुंबईचा पैसा, लखनौची जमीन, ठाकरेंच्या नावाने गलका…

छगन भुजबळांची नाशिकमधून माघार, गोडसेंचा मार्ग मोकळा!

बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवण्यावरून वाद, तरुणाची गोळ्या झाडून हत्या!

‘संध्याकाळी तिचा वर्ग संपल्यावर एका अज्ञात व्यक्तीने कॉलेज कॅम्पसमध्ये तिला गाठले आणि ३० सेकंदांत तिच्यावर सात ते आठवेळा वार केले. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला,’ असे त्यांनी सांगतिले. ‘आरोपीने आपल्या मुलीला लग्नाचा प्रस्ताव दिला होता आणि तिने त्याला नकार दिला होता. तिने त्याला सांगितले की, ते वेगवेगळ्या धर्मांचे आहेत आणि तिला कोणत्याही नात्यात रस नाही. यामुळे तो माणूस चिडला आणि त्याने तिची हत्या केली,’ असा दावा हिरेमठ यांनी केला. नेहाची हत्या करून पळून गेलेल्या फयाज खोंडूनाईक याला पोलिसांनी गुरुवारी अटक केली.

Exit mobile version