27.6 C
Mumbai
Sunday, April 27, 2025
घरक्राईमनामामुझफ्फरनगर: तरुणीचा हिजाब उतरवायला लावून सोबतच्या हिंदू तरुणाला मारहाण

मुझफ्फरनगर: तरुणीचा हिजाब उतरवायला लावून सोबतच्या हिंदू तरुणाला मारहाण

सहा आरोपींना अटक

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये एका महिलेचा हिजाब उतरवण्यात आला शिवाय तिच्यासोबत असलेल्या एका हिंदू तरुणावर एका गटाने हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेशी संबंधित तरुण आणि तरुणी कर्जाचा हप्ता वसूल करून परतत असताना ही घटना घडली. खालापर येथे राहणाऱ्या फरहानाची मुलगी फरहीन ही तिच्या आईच्या सूचनेनुसार सचिनसोबत मोटारसायकलवरून जात होती. त्यांचे काम करून परत येत असताना, त्यांना सुमारे १० जणांच्या गटाने थांबवले. या तरुणांनी तिचा हिजाब उतरवला आणि सचिन याला धक्काबुक्की करत मारहाण केली. शिवाय दोघांना शिवीगाळही केली. तरुणीची ओळख फरहीन (वय २० वर्षे) आणि सचिन (वय २५ वर्षे) अशी आहे. हे दोघेही उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेशी संबंधित होते.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळवले आणि पीडित दोघांना गर्दीतून बाहेर काढून पोलिस ठाण्यात नेले. फरहीनच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. “१२ एप्रिल रोजी दुपारी ४ ते ४:३० च्या सुमारास, भवन परिसरातील एक हिंदू पुरूष आणि खालापर येथील एक मुस्लिम महिला – दोघेही उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेत काम करत होते. कर्जाची परतफेड करून सुजदूहून परत येत होते. वाटेत, काही स्थानिक लोकांनी त्यांना अडवले आणि दरझी वाली गली येथे त्यांच्यावर हल्ला केला,” असे मुझफ्फरनगर शहर मंडळ अधिकारी राजू कुमार साओ यांनी सांगितले.

हे ही वाचा : 

मेहुल चोक्सीच्या अटकेवर बेल्जियमची पहिली प्रतिक्रिया, म्हटले…

केळी, ब्रोकली खाल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात

राम मंदिराच्या मुख्य शिखरावर कलश स्थापित

झारखंडचे मंत्री हफीजुल हसन म्हणतात, संविधानापेक्षा शरियत उच्च

खालापार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास करण्यात आला. व्हिडिओमधील तरुणांची ओळख पटल्यानंतर, रविवारी संध्याकाळी उशिरा शोएब, शमी, सरताज, शादाब, उमर आणि अर्श या सहा आरोपी मुस्लिम तरुणांना अटक करण्यात आली. आरोपींची चौकशी सुरू आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
245,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा