मुस्लिम तरुण नाव बदलून गरब्यात घुसले, तिघांना अटक

मुस्लिम तरुण नाव बदलून गरब्यात घुसले, तिघांना अटक

देशातील अनेक राज्यांमध्ये होणाऱ्या गरबा कार्यक्रमात मुस्लिमांच्या प्रवेशावर निर्बंध आहेत. असे असतानाही गरबा कार्यक्रमात ओळख लपवताना काही मुस्लिम तरुणांना पकडून मारहाण झाल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत.

अशीच बातमी मध्यप्रदेशातून समोर आली आहे. एका मुस्लिम तरुणाने आपले नाव बदलले आणि मंडला जिल्ह्यात आयोजित गरबा पंडालमध्ये प्रवेश केला. कोतवाली पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या नर्मदा इन हॉटेलमध्ये गरबा महोत्सवाचा कार्यक्रम सुरू होता. दरम्यान, गरबा पंडालमध्ये मुस्लिम तरुण खोटे नाव देऊन घुसल्याची माहिती बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यानंतर बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले.

हिंदू कार्यकर्त्यांनी पंडालमध्ये घुसून तपासणी सुरू केली, तेव्हा एका मुस्लिम गटाला पकडण्यात आले. त्यानंतर गरब्याच्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आणि गरबा थांबवला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तीन मुस्लिम तरुणांना अटक केली. त्यानंतर बऱ्याच वेळाने गरब्याचा कायर्क्रम सुरु झाला. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

हे ही वाचा:

टेकूच्या शोधात शिल्लक सेना…

अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक जाहीर, भाजपाकडून मुरजी पटेल रिंगणात

भारतीय हवाई दलाला मिळाली स्वदेशी ‘प्रचंड’ ताकद

दुर्गापूजा मंडपात आग लागून ५२ जण जखमी, तीन जणांचा मृत्यू

मध्य प्रदेशात बिगर हिंदूंना गरब्याला येण्यास बंदी घालण्यात आली आहे. इंदूरमध्ये अनेक मुस्लिम तरुण एकत्र गरबा करताना पकडले गेले. तर नुकतेच उज्जैनमध्येही मुस्लिम तरुणांनी नाव लपवून गरबा पंडालमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर हिंदू संघटनेच्या लोकांनी त्यांना बेदम मारहाण केली. सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर यांनी तर एखाद्याला मुस्लिमाला गरबा खेळायला यायचे असेल तर मूर्तीची पूजा करावी लागेल, असे सांगितले होते.

Exit mobile version