बुरखा घालण्यास मनाई करणाऱ्या हिंदू पत्नीची भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील पूर्व उपनगरात घडली आहे. याप्रकरणी टिळक नगर पोलिसांनी पती विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
याघटनेने पूर्व उपनगरात एकच खळबळ उडाली आहे, मात्र ही हत्या मुस्लिम पेहरावावरून झालेली नसून दोघांमध्ये सुरु असलेल्या घटस्फ़ोटावरून झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील काळे यांनी दिली आहे. रुपाली रमेश चंदनशिवे (२०) असे हत्या करण्यात आलेल्या विवाहितेचे नाव आहे असून इकबाल शेख असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे.
रुपाली ही चेंबूर येथील पी.एल.लोखंडे मार्ग या ठिकाणी राहणारी असून तीन वर्षापूर्वी तिचा प्रेमविवाह त्याच परिसरात राहणाऱ्या इकबाल शेख याच्यासोबत झाला होता. इकबाल शेख याचा पूर्वी एक विवाह झालेल्या असून त्याने पहिल्या पतीला सोडल्यानंतर रूपालीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यासोबत दुसरा विवाह केला होता. या दाम्पत्याला २ वर्षाचा एका मुलगा आहे, इकबालच्या कुटुंबीयांनी रुपालीचे नाव बदलून जारा असे ठेवले होते. इक्बाल व त्याचे आईवडिल हे जाराला (रुपाली) मुस्लीम धर्माप्रमाणे पेहराव करण्यासाठी व मुस्लीम रितीरिवाजाप्रमाणे वागण्याकरीता दबाव टाकत होते तसेच उर्दू आणि हिंदीमध्येच बोलण्यास सांगत होते. या कारणावरुन इक्बाल व जारामध्ये नेहमी भांडण होत होते असे रुपाली उर्फ जारा हिची बहीण करुणा रॉयल हिने पोलिसांना दिली आहे.
नेहमीच्या भांडणाला कंटाळून रुपालीने ६ महिन्यापूर्वी घर सोडले व पती पत्नी हे दोघे वेगवेगळे राहत होते. इकबाल तिला सतत फोन करून तिच्याशी भांडण करीत होता व तिला बळजबरीने सोडचिठ्ठी देण्यासाठी टीओच्यावर दबाव टाकत होता अशी माहिती बहीण करुणा हिने पोलिसांना दिली. रुपाली ही मागील दोन महिन्यापासून तिच्या दोन मैत्रिणीसोबत पी.एल लोखंडे मार्ग चेंबूर येथे राहण्यास आली होती.
घटस्थापनेच्या दिवशी रात्री रुपालीची आई, बहीण तसेच रुपालीची सासू व इतर नणंदा रुपाली आणि तिच्या पतीच्या भांडण मिटवून दोघे एकत्र राहावे याच्यावर चर्चा करीत असताना त्याच चाळीत राहणार एक मुलगा धावत येऊन त्याने रूपालीला तिच्या पतीने चाकूने भोसकून मारले असल्याची माहिती दिली.
हे ही वाचा:
रियाज भाटीला खंडणीविरोधी पथकाकडून अटक
आठ राज्यांमध्ये NIA कडून PFI वर कारवाई
दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू केशव महाराजने दाखवून दिले खरे हिंदुत्व
नवरात्र २०२२: करवीर आणि महालक्ष्मीची गाथा
सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली असता रुपाली ही रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिच्या जवळ गेल्यावरतिच्या पोटावर चाकूने वार करण्यात आल्याचे व जवळच रक्ताने माखलेला चाकू पडल्याचे दिसले. या घटनेची माहिती टिळक नगर पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी रूपालीला तात्काळ राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.
याप्रकरणी टिळक नगर पोलिसांनी इकबाल याच्या विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील काळे यांनी दिली. तसेच ही हत्या सोडचिठ्ठी आणि मुलाचा ताबा मिळविण्याच्या वादातून झाला असल्याचे काळे यांनी सांगितले.