२० वर्षांपूर्वी फसवून मुस्लिम धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्यात आलेल्या एका दांपत्याला पुन्हा हिंदू धर्मात सामावून घेण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील पूरे उजडे गावात ही घटना घडली. स्वराज्य या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार शिवप्रसाद लोधा आणि कविता अशी या दांपत्याची नावे आहेत. त्या गावातील प्रमुख मोहम्मद अमील शेख याने त्यांना सरकारी कागदपत्रे देतो इस्लाम स्वीकारा असे आमीष दाखवत धर्मपरिवर्तन केले. शेखने त्या दांपत्याला सांगितले की, मुस्लिमांच्या या गावात राहायचे असेल तर धर्मपरिवर्तन हा एकमेव मार्ग आहे. शिव आणि कविता हे नोकरीच्या शोधात या गावात आले होते.
पण त्यांच्याकडे कोणतेही ओळखपत्र नव्हते. त्यामुळे ही संधी साधून ग्रामप्रमुखाने त्याचा फायदा उठविण्याचे ठरविले. त्यांचे धर्मपरिवर्तन केल्यानंतर त्यांना रेशन कार्ड आणि मतदार ओळखपत्र देण्यात आले. शिवचे नाव अब्दुल्ला तर कविताचे फातिमा ठेवण्यात आले. मोहम्मद अमील शेखने तर त्यांच्या आईवडिलांची नावेही मुस्लिम धर्मियांप्रमाणे बनवून घेतली.
वाराणसी जिल्ह्यातील दुलाहीपूर गावातील जमीन त्यांनी विकली होती. त्यानंतर त्यांना पूरे उजडे गावात जाण्यासाठी काही मुस्लिम कुटुंबियांनी सांगितले. कविता ही त्यावेळी गर्भार होती. पण तिचा गर्भपात झाला. त्यावेळी तिच्या शेजारच्या मुस्लिम कुटुंबाने हिंदू देवतांची पूजा करण्यास अर्थ नाही, स्थानिक दर्ग्यात गेली तर फायदा होईल असे सांगितले.
हे ही वाचा:
योगी आदित्यनाथ एकेकाची मस्ती उतरवण्यात वाकबगार आहेत!
डोंबिवली स्फोटप्रकरणातील शोध थांबला, तीन कामगार अद्याप बेपत्ता!
पश्चिम बंगाल-ओडिशाच्या किनाऱ्यावर ‘रेमल चक्रीवादळ’ धडकण्याची शक्यता!
ईव्हीएमवर भाजपचा टॅग असल्याचा तृणमूलचा दावा फुसका!
त्याचवेळी कविता ही मोहम्मद अमिल शेखकडे काम करत होती. पण तिला टिकली लावण्यास, साडी परिधान करण्यास मनाई करण्यात आली. तिने सलवार सूट घालावा आणि मुस्लिम महिलांप्रमाणेच वागावे असे सांगण्यात आले. दोन वर्षांनी लोधा याने पूरे उजडे गावाबाहेर एक जमीन घेतली. त्यासाठी ४० हजार रुपये भरले. तेव्हा त्यांना कागदपत्रांची आवश्यकता होती. तेव्हा शेखने त्यांना धर्मांतरण करण्याचा मार्ग सांगितला. तिथे त्यांना कलमा पढण्यास सांगून परिवर्तित करण्यात आले.
पण मुस्लिम झाल्यानंतरही त्यांचा छळ थांबला नाही. त्यांना इस्लामी पद्धतीने जीवन व्यतित करण्यास भाग पाडण्यात आले. शिव याला मशिदीत नमाझ पढावा लागत होता तर कविताला रोझे ठेवावे लागत होते. कोणतेही हिंदू सण त्यांनी साजरे करू नये असे त्यांना सांगण्यात आले. शेखने शिवला धमकावले की, त्याची कागदपत्रे आपल्या नावावर केली नाहीत तर त्याला खतना करावा लागेल. त्या भीतीतून त्याने जमिनीची कागदपत्रे शेखच्या नावे केली. पण खतना न केल्यामुळे त्याला मुस्लिम गावकऱ्यांचा छळ सहन करावा लागला.
अखेर हे दांपत्य २०२३मध्ये राम बल या संघटनेच्या संपर्कात आले. त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून त्यांना यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पुन्हा हिंदू धर्मात आणले. पोलिस बंदोबस्तात हा सोहळा पार पडला. कविता म्हणाली की, आम्हाला धर्मांतरणाच्या जाळ्यात ओढण्यात आले होते. या सोहळ्याला आम्हाला शेखला बोलवायचे होते पण त्याचे आधीच निधन झाले होते.