चुनाभट्टीतील तरुणाच्या हत्येचा लागला छडा, हे होते कारण…

धारावी येथे आरोपी लपून बसले होते

चुनाभट्टीतील तरुणाच्या हत्येचा लागला छडा, हे होते कारण…

चेंबूर वाशीनाका येथे राहणाऱ्या १९ वर्षीय कॉलेज तरुणाची गुरुवारी सायंकाळी झालेल्या हत्येचा छडा लागला आहे. पोलिसांनी यासंदर्भात जो कट रचण्यात आला त्याची माहितीच समोर आणली आहे.

या प्रकरणी गुन्हे शाखा कक्ष ६ आणि ७ च्या पथकाने दोन जणांना  धारावी परिसरातून शुक्रवारी अटक केली आहे. आदित्य गणेश त्रिभुवन आणि कल्पम इजाज सय्यद असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. आदित्य हा गोवंडीतील शिवाजी नगर येथे राहणारा असून दुसरा आरोपी कल्पम हा कल्याण कोनगाव येथे राहणारा आहे. चेंबूर वाशीनाका येथे राहणारा मुदस्सीर मुख्तार शेख (१९) याची गुरुवारी सायंकाळी मोटारसायकल वरून आलेल्या दोघांनी चेंबूर सिंधी सोसायटी प्लॉट नंबर ८४ समोर भोसकून हत्या केली होती, मुदस्सीर हा चेंबूर येथील स्वामी विवेकानंद कॉलेजमध्ये शिकत होता.

हे ही वाचा:

३० तासाच्या शोधानंतर कोल्हापूर सहकारी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नेले मुंबईत

अमरिंदरसिंग यांच्या पत्नींना काँग्रेस पक्षाने दिला डच्चू

योगी आदित्यनाथ सर्वोत्तम मुख्यमंत्री

सॅमसंगचे आता भारतातच ‘स्मार्ट’ उत्पादन

गुरुवारी सायंकाळी कॉलेज सुटल्यावर मुदस्सीर हा दोन मैत्रिणी सह घरी जात असताना भररस्त्यात ही घटना घडली होती. या प्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. परिमंडळ ६ विशेष पथक आणि गुन्हे शाखा  कक्ष ६ आणि ७ चे पथक मारेकऱ्यांचा शोध घेत होते, दरम्यान हे दोन्ही धारावी येथे एका ठिकाणी दडून बसल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी धारावी येथून आदित्य आणि आदित्य गणेश त्रिभुवन आणि कल्पम इजाज सय्यद या दोघांना अटक केली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आदित्य याचे ज्या मुलीसोबत प्रेमप्रकरण सुरु होते, ती मुलगी आदित्यला सोडून मुदस्सीरसोबत दिसू लागली होती. या रागातून आदित्यने मित्राच्या मदतीने गुरुवारी मुदस्सीर याची हत्या केली होती.

Exit mobile version